Monday, March 09, 2026 02:04:24 AM

Lonavala Crime : पत्नीनं ब्लॉक केलं, पतीने ईमेलवर पाठवला शेवटचा मेसेज; 250 फूट खोल दरीत उडी घेत तरुणाने संपवलं आयुष्य

पत्नीशी झालेल्या वादामुळे आणि तिने संपर्क तोडल्यामुळे नैराश्यात गेलेल्या एका सॉफ्टवेअर हबमधील कर्मचाऱ्याने 250 फूट खोल दरीत उडी मारून आपले जीवन संपवले.

lonavala crime  पत्नीनं ब्लॉक केलं पतीने ईमेलवर पाठवला शेवटचा मेसेज 250 फूट खोल दरीत उडी घेत तरुणाने संपवलं आयुष्य

Lonavala Crime : संसारातील छोटीशी भांडणे किती भयानक वळण घेऊ शकतात, याची प्रचिती लोणावळ्यातील टायगर पॉइंटवर आली आहे. पत्नीशी झालेल्या वादामुळे आणि तिने संपर्क तोडल्यामुळे नैराश्यात गेलेल्या एका सॉफ्टवेअर हबमधील कर्मचाऱ्याने 250 फूट खोल दरीत उडी मारून आपले जीवन संपवले.

वाढदिवसाचा मेसेज ठरला शेवटचा निरोप
मूळचे पश्चिम बंगालचे असलेले आणि सध्या हिंजवडीत सेल्स विभागात कार्यरत असणारे विरेंद्र सिन्हा यांचा तीन वर्षांपूर्वी विवाह झाला होता. मात्र, गेल्या काही दिवसांपासून पती-पत्नीमध्ये टोकाचे वाद सुरू होते. 7 फेब्रुवारीला झालेल्या मोठ्या भांडणानंतर 10 फेब्रुवारीला पत्नी माहेरी निघून गेली आणि तिने विरेंद्र यांचा नंबर 'ब्लॉक' केला. गुरुवारी पत्नीचा वाढदिवस होता. विरेंद्र यांनी संपर्काचा प्रयत्न केला, पण कॉल लागत नसल्याने त्यांनी पहाटे 5 ते 6 च्या दरम्यान पत्नीला ईमेल आणि टेक्स्ट मेसेज पाठवला. "मी आयुष्य संपवत आहे," असा निरोप देऊन त्यांनी मृत्यूला कवटाळले. लोणावळा ग्रामीण पोलिसांनी शिवदुर्ग मित्र या बचाव पथकाच्या साहाय्याने दरीतून विरेंद्र यांचा मृतदेह बाहेर काढला.

सेल्फीच्या मोहात आणखी एका तरुणाचा अंत
दुसरीकडे, 8 फेब्रुवारीला खंडाळा टेकडीवर फिरायला आलेल्या 26 वर्षीय प्रज्वल वसंत गिरी या तरुणाचा सेल्फी घेताना तोल जाऊन 70 ते 80 फूट दरीत कोसळून मृत्यू झाला. हॉटेलमध्ये चेक-इन करण्यासाठी वेळ असल्याने प्रज्वल नातेवाईकांसह सनसेट पाहायला गेला होता, मात्र तो सूर्यास्त त्याच्या आयुष्याचा शेवटचा सूर्यास्त ठरला.

हेही वाचा - Ahilyanagar Crime : अहिल्यानगरमध्ये दोन गटात गँगवॉर; जुन्या वादातून तुफान राडा, तर गोळीबारात एकाचा मृत्यू

पर्यटन स्थळांवरील सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर
गेल्या आठवड्यात एका उच्चशिक्षित तरुणीनेही याच परिसरात जीवन संपवलं होतं. टायगर पॉइंट आणि लायन्स पॉइंट यांसारख्या ठिकाणी पर्यटकांच्या सुरक्षेसाठी लोखंडी जाळ्या बसवणे आणि पोलिसांची गस्त वाढवणे गरजेचे असल्याचे स्थानिक नागरिकांकडून बोलले जात आहे.


सम्बन्धित सामग्री