सुप्रीम कोर्टापर्यंत जाऊन लढणार आणि जिंकणार; ईडीने आरोपपत्र दाखल केल्यानंतर रोहित पवारांची प्रतिक्रिया

शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांच्या अचडणीत वाढ होण्याची शक्यता आहे. मनी लॉड्रिंग प्रकरणात अंमलबजावणी संचालनालयाकडून त्यांच्याविरुद्ध आरोपपत्र दाखल केले आहे.

सुप्रीम कोर्टापर्यंत जाऊन लढणार आणि जिंकणार; ईडीने आरोपपत्र दाखल केल्यानंतर रोहित पवारांची प्रतिक्रिया

पुणे: शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांच्या अचडणीत वाढ होण्याची शक्यता आहे. मनी लॉड्रिंग प्रकरणात अंमलबजावणी संचालनालयाकडून त्यांच्याविरुद्ध आरोपपत्र दाखल केले आहे. हा गुन्हा मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने 2019 मध्ये नोंदवला आहे. तपास यंत्रणेनुसार, शिखर बँकेचे तत्कालीन अधिकारी आणि संचालकांनी नियमबाह्य पद्धतीने सहकारी साखर कारखाना त्यांच्या नातेवाईकांना आणि खासगी व्यक्तींना अतिशय कमी दरात विकला होता. आता ईडीने आरोपपत्र दाखल केल्यानंतर आमदार रोहित पवार यांनी पुण्यात पत्रकार परिषद घेत या प्रकरणी सविस्तर माहिती दिली आहे. सेशन कोर्टापासून सुप्रीम कोर्टापर्यंत जाईल आणि ही लढाई मी जिंकणार आहे असेही यावेळी त्यांनी म्हटले आहे. 

'97 लोकांची नाव बाजूला ठेवून माझा एकट्यावर कारवाई'
आमदार रोहित पवार म्हणाले, ईडीने माझ्या नावाचं आरोपपत्र दाखल केलं आहे. एम.ए.सी बँक (महाराष्ट्र राज्य सहकारी बँक) कडून 2012 मध्ये कर्ज घेतलेले आहे. त्यासाठी हे आरोपपत्र दखल केलं होतं. एका कारखान्यासाठी कर्ज घेतले होते. 2009 ला कन्नड सहकारी साखर कारखाना आहे. पहिल्यांदा टेंडर काढले. एम.ए.सी बँकेने आर्थिक तपावत असल्याचा रिपोर्ट नाबार्डला 2011 ला दिला. तिसऱ्यांदा कन्नड कारखान्याचे टेंडर निघाल्यानंतर आम्ही बारामती ॲग्रोने हा कारखाना घेतला. 100 लोकाची नावे नाबार्डने घेतली होती. ईडी दाखल केला आहे. त्यामध्ये 97 लोकांची नावे आहेत. मात्र त्यावेळी यात माझे नाव नव्हते. माझी अधिकारी ऍडमिस्टरने काढले. 97 लोकांचे नाव बाजूला ठेवून माझा एकट्यावर कारवाई करण्याचे राजकीय दृष्टिकोनातून झाला असे रोहित पवारांनी म्हटले.  

हेही वाचा: सोनोग्राफीच्या नावाखाली डॉक्टरने अल्पवयीन मुलीशी केले अश्लील चाळे

'कुठेही चुकीचं काही केलं नाही'
माझा आवाज दाबण्याचा प्रयत्न सरकार आणि त्यांच्या एजन्सीच्या माध्यमातून झाला.यात मुद्दाम माझं नाव घेतलं गेलं. तो कारखाना माझा आहे. मी चालवतो त्यात कुठल्याही शेतकऱ्यांना अडचण येणार नाही. माझी बारा बारा तास चौकशी करण्यात आली. आरोप पत्र दाखल झालं. ईडीला यात काही सापडलं नाही. आम्हाला आता कोर्टात जाऊन न्याय मागवा लागेल. कुठेही चुकीचं काही केलं नाही. त्यामुळे मला विश्वास आहे न्यायालयाच्या माध्यमातून मला न्याय मिळेल असे रोहित पवार यांनी म्हटले. 

'सेशन कोर्टापासून सुप्रीम कोर्टापर्यंत जाऊन जिंकणार'
रोहित पवार म्हणाले, "सेशन कोर्टापासून सुप्रीम कोर्टापर्यंत जाईल आणि ही लढाई मी जिंकणार आहे. आम्ही घाबरणारी पळणारी लोक नाही. आम्ही लढणारी लोक आहोत. मराठी माणसं आहोत. दिल्लीसमोर कधीही झुकत नाही. विचारांची लढाई आहे, विचाराबरोबर अजून आहे आणि पुढेही राहणार आहे. अनेक लोक पळून गेले, लाचारी स्वीकारली, आम्ही तसे करणार नाही. 97 लोकांमधील काही लोक भाजपमध्ये, काही अजित दादाकडे, काही एकनाथ शिंदे यांच्याकडे आहेत. मी एकटा ईडी विरोधात लढत आहे. लढणार आणि जिंकणार आहे".

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number