Ashadhi Wari Palkhi Schedule : यंदा माऊलींच्या पालखीचे प्रस्थान उशिरा होणार ? ‘या’ कारणामुळे वारीच्या वेळापत्रकाचा तिढा वाढला

नियोजित तारखेनुसार हे वेळापत्रक जाहीर होणे अपेक्षित होते, मात्र काही तांत्रिक आणि प्रशासकीय कारणांमुळे वेळापत्रकाची अधिकृत घोषणा लांबणीवर पडली आहे.

Ashadhi Wari Palkhi Schedule : यंदा माऊलींच्या पालखीचे प्रस्थान उशिरा होणार ? ‘या’ कारणामुळे वारीच्या वेळापत्रकाचा तिढा वाढला

Ashadhi Wari Palkhi Schedule : वारकरी संप्रदायाचे लक्ष लागून राहिलेल्या संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज आषाढी वारी पालखी सोहळ्याच्या वेळापत्रकाबाबत सध्या संभ्रमावस्था निर्माण झाली आहे. नियोजित तारखेनुसार हे वेळापत्रक जाहीर होणे अपेक्षित होते, मात्र काही तांत्रिक आणि प्रशासकीय कारणांमुळे वेळापत्रकाची अधिकृत घोषणा लांबणीवर पडली आहे. प्रशासनाकडून अद्याप काही बाबींवर स्पष्टता न मिळाल्याने माऊली संस्थानने सावध पवित्रा घेतला आहे.

नियोजनाचा पेच: भवानी पेठेतील मुक्कामावरून निर्माण झाला अडथळा
पालखी सोहळ्याचे वेळापत्रक रखडण्यामागे पुणे शहरातील मुक्कामाचे नियोजन हे मुख्य कारण असल्याचे समजते. पालखीचा मुक्काम 9 आणि 10 जुलै रोजी पुण्याच्या भवानी पेठेतील विठ्ठल मंदिरात असतो. मात्र, या ठिकाणी वारकऱ्यांसाठी आवश्यक सोयी-सुविधा, स्वच्छता आणि निवासाच्या व्यवस्थेबाबत अद्याप कोणताही लेखी प्रस्ताव किंवा ठोस खात्री मंदिर प्रशासनाकडून मिळालेली नाही. वारकऱ्यांची कोणतीही गैरसोय होऊ नये, या भूमिकेवर संस्थान ठाम असून व्यवस्थेचे स्पष्ट चित्र समोर येईपर्यंत वेळापत्रक प्रसिद्ध न करण्याचा निर्णय समितीने घेतला आहे.

पुढील 8 दिवसांत महत्त्वाची बैठक 
या समस्येवर तोडगा काढण्यासाठी पुढील 8 दिवसांत एका उच्चस्तरीय बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. या बैठकीत प्रशासकीय अधिकारी, लोकप्रतिनिधी, विठ्ठल मंदिर प्रमुख, दिंडी प्रमुख आणि संस्थानचे विश्वस्त सविस्तर चर्चा करतील. 12 एप्रिल पर्यंत मंदिर प्रशासनाकडून अपेक्षित उत्तर न आल्याने संस्थानला हा निर्णय लांबणीवर टाकावा लागला आहे. आता सर्व घटकांशी चर्चा करूनच पुढील पाऊल उचलले जाणार आहे.

हेही वाचा – Todays Horoscope : 'या' राशीच्या व्यक्तींना अमर्याद यश मिळण्याची शक्यता; जाणून घ्या कसा आहे आजचा दिवस?

1 मे रोजी जाहीर होणार अधिकृत वेळापत्रक
वारीच्या वेळापत्रकासाठी आता 1 मे ही तारीख महत्त्वाची ठरणार आहे. नियोजनानुसार, 26 एप्रिल रोजी पंढरपूर येथे होणाऱ्या बैठकीत सर्व बाजू तपासून अंतिम मसुदा वारकरी समाजासमोर ठेवला जाईल. त्यानंतर, सर्व संमतीने 1 मे रोजी आळंदीत पालखी सोहळ्याचे अधिकृत आणि अंतिम वेळापत्रक घोषित केले जाईल. सोयी-सुविधांची पूर्ण खात्री पटल्यानंतरच वेळापत्रक जाहीर होणार असल्याने, वारकऱ्यांनी अधिकृत घोषणेपर्यंत प्रतीक्षा करावी, असे आवाहन संस्थानतर्फे करण्यात आले आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number