NCP Internal Conflict: पटेल-तटकरेंची नाराजी दूर होणार? राष्ट्रवादीतील अंतर्गत वादावर पडदा टाकण्यासाठी सुनेत्रा पवारांनी घेतला ‘हा’ मोठा निर्णय

अजित पवार यांच्या पश्चात राष्ट्रवादी काँग्रेसची (अजित पवार गट) सूत्रे हाती घेतलेल्या सुनेत्रा पवार आता पक्षात निर्माण झालेली अंतर्गत धुसफूस शमवण्यासाठी सरसावल्या आहेत.

NCP Internal Conflict: पटेल-तटकरेंची नाराजी दूर होणार? राष्ट्रवादीतील अंतर्गत वादावर पडदा टाकण्यासाठी सुनेत्रा पवारांनी घेतला ‘हा’ मोठा निर्णय

NCP Internal Conflict: अजित पवार यांच्या पश्चात राष्ट्रवादी काँग्रेसची (अजित पवार गट) सूत्रे हाती घेतलेल्या सुनेत्रा पवार आता पक्षात निर्माण झालेली अंतर्गत धुसफूस शमवण्यासाठी सरसावल्या आहेत. प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांसारख्या दिग्गज नेत्यांना राष्ट्रीय कार्यकारिणीतून वगळल्याच्या वृत्तानंतर पक्षात मोठी खळबळ उडाली होती. आता ही अस्वस्थता दूर करण्यासाठी राज्याच्या उपमुख्यमंत्री आणि पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षा सुनेत्रा पवार यांनी 'मिशन डॅमेज कंट्रोल' हाती घेतले आहे.

ज्येष्ठ नेत्यांना डावलल्याने अस्वस्थता वाढली?
नव्या कार्यकारिणीत प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांची नावे नसल्याचे समोर आल्यावर, पक्षाची संपूर्ण सूत्रे सुनेत्रा पवार, पार्थ पवार आणि जय पवार यांच्याभोवतीच केंद्रित होत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली. त्यातच पटेल आणि तटकरे यांनी ज्येष्ठ नेते शरद पवार यांची भेट घेतल्याने पक्षात उभ्या फुटीची टांगती तलवार निर्माण झाली होती. गेल्या 15 दिवसांपासून सुरू असलेला हा अंतर्गत कलह थांबवण्यासाठी सुनेत्रा पवार आता स्वतः मैदानात उतरल्या आहेत.

सुनेत्रा पवारांची 'कोअर टीम'सोबत तातडीची बैठक
पक्षातील ज्येष्ठ नेत्यांमधील गैरसमज दूर करण्यासाठी सुनेत्रा पवार या आठवड्यात 'एनसीपी कोअर टीम'ची विशेष बैठक बोलावणार आहेत. सूत्रांच्या माहितीनुसार, त्या स्वतः प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांच्याशी संवाद साधून त्यांच्या तक्रारी जाणून घेणार आहेत. पक्षात पुन्हा एकजूट निर्माण व्हावी आणि नेतृत्वाबाबत कोणताही संभ्रम राहू नये, यासाठी सुनेत्रा पवारांनी मध्यस्थीचा मार्ग स्वीकारला आहे.

हेही वाचा – VD Satheesan Kerala CM Oath: केरळमध्ये काँग्रेसचे नवे पर्व! व्ही. डी. सतीशन यांनी घेतली मुख्यमंत्रीपदाची शपथ, सोहळ्याला राहुल-प्रियांका गांधींची उपस्थिती

आमदारांशीही साधणार थेट संवाद
याशिवाय, पक्षाच्या आमदारांमध्येही काही प्रमाणात नाराजी असल्याचे बोलले जात आहे. ही परिस्थिती हाताबाहेर जाण्यापूर्वीच सुनेत्रा पवारांनी पुढील आठवड्यात सर्व आमदारांची बैठक बोलावली आहे. या बैठकीत त्या स्वतः आमदारांच्या अडचणी ऐकून घेणार आहेत. पक्षाची संभाव्य पडझड रोखण्यासाठी आणि आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर संघटना मजबूत ठेवण्यासाठी सुनेत्रा पवारांनी उचललेले हे पाऊल महत्त्वाचे मानले जात आहे.
 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number