Pratap Sarnaik On Maharashtra Politics: राज्याच्या राजकारणात मोठी उलथापालथ होणार असल्याचे संकेत परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिले आहेत. त्यांनी पंढरपूरमध्ये माध्यम प्रतिनिधींशी संवाद साधताना राज्यातील राजकीय घडामोडींवर आपले मत मांडले. प्रताप सरनाईक यांनी सांगितले की, 'ठाकरे बंधू एकत्र येत आहेत ही चांगली गोष्ट आहे. कुटुंबाने एकत्र येणे महत्वाचे आहे. वीस वर्षांनंतर कुणाची ताकद किती आहे हे समजले असेल, पण एकत्र येऊन ठिकऱ्या उडवण्याची भाषा करणाऱ्यांच्या हातात पक्षप्रमुख एकनाथ शिंदे टिपऱ्या देतील,' असे सरनाईक यांनी स्पष्ट केले.
हेही वाचा - Devendra Fadnavis On Phaltan Doctor Case: जे जे दोषी....सगळ्यांची नावे हातावर लिहून..., महिला डॉक्टर मृत्यूप्रकरणी फडणवीसांची प्रतिक्रिया
तथापी, प्रताप सरनाईक यांनी मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसंबंधी अंतिम निर्णय घेतील, असेही सांगितले. शिवसेनेच्या महाराष्ट्रातील ‘टायगर मिशन’बाबत त्यांनी थोडा थांबण्याचा सल्ला दिला, एक महिन्यात तुम्हाला पाहिजे असलेली बातमी मिळेल, असं भाकितही यावेळी प्रताप सरनाईक यांनी केलं.
हेही वाचा - Rahul Gandhi On Phaltan Doctor Case : भाजप सरकारचा अमानवीय आणि असंवेदनशील चेहरा समोर, सातारा डॉक्टर प्रकरणी राहुल गांधींचा निशाणा
दरम्यान, यावेळी प्रताप सरनाईक यांनी शिवसेनेचे नेते संजय राऊत यांच्याबाबतही टिप्पणी केली, संजय राऊत यांना रात्री दिवा स्वप्न पडतात आणि तेच ते सकाळी बोलतात. तसेच, त्यांनी शरद पवार यांना आपले राजकीय गुरू मानले असल्याची टीकाही यावेळी प्रताप सरनाईक यांनी केली.