विजय चिडे .प्रतिनिधी. छत्रपती संभाजीनगर: छत्रपती संभाजीनगरातून एक धक्कादायक माहिती समोर येत आहे. डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे सिझेरियन करताना जिल्हा सामान्य रुग्णालयामध्ये महिलेच्या आतड्यांना छिद्र पडल्याने महिलेचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली होती. 'अवघ्या 6 दिवसाच्या बळाच्या डोक्यावरील आईचे क्षेत्र हरवले. याला डॉक्टर जबाबदार आहेत', असा आरोप करत मृतदेह जिल्हा रुग्णालयासमोर ठेवून नातेवाईकांनी आंदोलन केले.
हेही वाचा: Navi Mumbai: ऐरोली रेल्वे स्टेशन परिसरात सिलेंडरचा स्फोट
त्यानंतर रुग्णालय प्रशासनाने तीन सदस्य समिती चौकशीसाठी नेमली. या घटनेमध्ये आता युवा सेनेने देखील उडी घेत रुग्णालय प्रशासनाला निवेदन दिले असून, 'येत्या 7 दिवसात दोषी डॉक्टरांवर कारवाई केली नाही तर युवासेनेचे रौद्ररूप बघायला तयार राहा', असा गार्भित इशारा युवासेनेने दिला आहे.