हल्लेखोर आला, महिलेवर गोळी झाडली अन्…. शिरूरमध्ये पुन्हा गोळीबाराचा थरार!

Shirur News : पुणे जिल्ह्यातील शिरुर तालुक्यात पुन्हा एकदा गोळीबाराची घटना समोर आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. कारेगाव येथे अज्ञात हल्लेखोराने गोळीबार केल्याची घटना घडली.
हल्लेखोर आला, महिलेवर गोळी झाडली अन्…. शिरूरमध्ये पुन्हा गोळीबाराचा थरार!
पुण्यात पुन्हा गोळीबाराची घटना

पुणे : पुणे जिल्ह्यातील शिरुर तालुक्यात पुन्हा एकदा गोळीबाराची घटना समोर आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. कारेगाव येथे अज्ञात हल्लेखोराने गोळीबार केल्याची घटना घडली. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या हजमा शेख यांना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, उपचारादरम्यान डॉक्टकांनी त्यांना मृत घोषित केलं. विशेष म्हणजे, या संपूर्ण गोळीबाराचा थरार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे.

कारेगावात गोळीबाराचा थरार
या घटनेनंतर पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत तपासाला सुरुवात केलेली आहे. दरम्यान, गोळीबाराची संपूर्ण घटना ही परिसरात लावण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे,त्यामुळेच या फुटेजच्या आधारे हल्लेखोरांची ओळख पटवण्याचे प्रयत्न पोलिसांकडून सुरु आहेत.

घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेज पोलिसांच्या हाती लागल्याने या तपासाला महत्त्वाची दिशा मिळण्याची शक्यता आहे. हा हल्लेखोर नेमका कोण होता, तो कोणत्या दिशेने आला तसेच गोळीबार केल्यानंतर कुठे पसार झाला, याचा शोध सध्या घेतला जात आहे. तसेच या हल्ल्यामागे नेमकं कारण काय होतं, याचाही तपास पोलिसांकडून घेतला जात आहे.

कारेगावातील या घटनेनंतर नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झाले आहे. शिरुर तालुक्यात याआधीही अशा हिंसक घटनांची चर्चा असतानाच पुन्हा गोळीबाराची घटना घडल्याने कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न समोर आलेला आहे. दरम्यान, हजमा शेख यांच्या झालेल्या हल्ल्यामागे वैयक्तित वाद, पूर्ववैमनस्य किंवा अन्य कोणतं कारण आहे का, याबाबत अद्याप अधिकृत माहिती समोर आलेली नाही.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version