शाओमीच्या पुढील flagship स्मार्टफोनबद्दल नवे लीक समोर आले आहेत. Xiaomi 17 Ultra मध्ये मोठा कॅमेरा अपग्रेड मिळू शकतो, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. कंपनीने अधिकृत लाँच डेट जाहीर केलेली नसली तरी कॅमेरा हार्डवेअरमध्ये मोठा बदल होणार असल्याची चर्चा आहे. नवीन लीकनुसार Xiaomi 17 Ultra मध्ये या वेळी Quad Camera ऐवजी Triple Camera Setup असू शकतो.
XiaomiTime च्या माहितीनुसार लीक झालेल्या फोटोंमध्ये चौथ्या कॅमेऱ्यासाठी जागा दिसत नाही. त्यामुळे शाओमीचे लक्ष कॅमेऱ्यांची संख्या वाढवण्यापेक्षा सेन्सर परफॉर्मन्स आणि फोकल-लेंथ सुधारण्यावर असल्याचे स्पष्ट होते. कॅमेऱ्याचा विकास “Nezha” या कोडनेमखाली झाला आहे. या मॉडेलमधील सर्वात मोठा बदल म्हणजे 200MP Telephoto Camera. यात Samsung चा S5KHPE सेन्सर मिळू शकतो.
मुख्य कॅमेऱ्यासाठी 50MP (OVX10500U) सेन्सर तर Ultra-Wide कॅमेऱ्यासाठी OV50M किंवा S5KJN5 सेन्सर वापरला जाऊ शकतो. फ्रंट कॅमेराही 50MP असण्याची शक्यता आहे. 200MP टेलिफोटो लेन्समध्ये 4×4 RMSC Technology, Lossless Zoom आणि Telephoto Macro सारखी प्रगत फीचर्स मिळतील असा अंदाज आहे. पूर्वी काही रिपोर्ट्समध्ये Xiaomi 17 Ultra मध्ये चार कॅमेरे असतील, असे म्हटले जात होते. पण या नवीन लीकनुसार कंपनीने यावेळी अधिक साधा पण कार्यक्षम Triple Camera Setup निवडला आहे. त्यामुळे फोटो क्वालिटी, झूम आणि फोकस परफॉर्मन्स यांवर अधिक भर दिला जाईल.
लाँचबद्दल अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा नाही. मात्र शाओमीच्या नेहमीच्या प्लॅननुसार Xiaomi 17 Ultra हा 2026 मध्ये Xiaomi 17 Series सोबत येऊ शकतो. या लाईनअपमध्ये Xiaomi 17, 17 Pro आणि 17 Pro Max ही मॉडेल्सही रिलीज होणार असल्याची चर्चा आहे. वाढत्या लीकनुसार Ultra मॉडेलमध्ये शाओमीची आत्तापर्यंतचा सर्वात प्रगत Telephoto System मिळण्याची शक्यता आहे.