Friday, May 24, 2024 08:34:08 AM

बुधवारी मोदी नाशकात

बुधवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी नाशिक दौऱ्यावर आहेत. नाशिक आणि दिंडोरी लोकसभा निवडणुकीच्या उमेदवारांसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी सभा घेणार आहेत.

बुधवारी मोदी नाशकात 
narendra modi

नाशिक, १४ मे, २०२४, प्रतिनिधी : बुधवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी नाशिक दौऱ्यावर आहेत. नाशिक आणि दिंडोरी लोकसभा निवडणुकीच्या उमेदवारांसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी सभा घेणार आहेत. 
दिंडोरी महायुतीच्या उमेदवार भारती पवार आणि नाशिक महायुतीचे उमेदवार हेमंत गोडसे यांच्या प्रचारार्थ पंतप्रधान नरेंद्र मोदी सभा घेणार आहेत. नाशिकच्या पिंपळगाव परिसरात मोदी घेणार सभा घेणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सभेची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. 
दिंडोरीत भाजपाच्या भारती पवार, राशपचे भास्कर भगरे आणि वंचित बहुजन आघाडीचे गुलाब बर्डे यांच्यात लढत होणार आहे. तर, नाशिकमध्ये शिवसेनेचे हेमंत गोडसे शिउबाठाचे राजाभाऊ वाजे यांच्यात लढत पाहायला मिळणार आहे. 


सम्बन्धित सामग्री