Sunday, February 09, 2025 05:43:04 PM

90-hour workweek?
आता 90 तास कार्यालयीन आठवडा?

सद्या नोकरदार वर्गामध्ये धाकधुक वाढली आहे. याच कारण आहे, कार्यालयात 90 तास काम.. नेमकं कार्यालयात किती तास काम करावं यावरून गेल्या काही दिवसांपासून चर्चा रंगल्यात.

आता 90 तास कार्यालयीन आठवडा

सद्या नोकरदार वर्गामध्ये धाकधुक वाढली आहे. याच कारण आहे, कार्यालयात 90 तास काम.. नेमकं कार्यालयात किती तास काम करावं यावरून गेल्या काही दिवसांपासून चर्चा रंगल्यात. काही दिवसांआधी उद्योग आणि व्यापार क्षेत्रातील काही व्यक्तींनी याच संदर्भात वक्तव्ये केल्याच देखील पाहायला मिळालं होत. कार्यालयीन आठवडा 70 ते 90 तासांचा करण्यात यावा अशा आशयाची ती वक्तव्ये होती. या वक्तव्यावरून अनेक ठिकाणी चर्चा रंगल्या. तर काही नोकरदार वर्गामध्ये संताप देखील व्यक्त करण्यात आला. यावर आता मात्र सरकारने स्पष्टीकरण दिलाय. 

जय महाराष्ट्र न्यूजच्या थेट संपर्कात राहण्यासाठी  व्हॉट्सअप चॅनेल वर क्लिक करा.

काय आहे निर्णय? 

सोमवारी केंद्र सरकारच्या वतीनं स्पष्ट करण्यात आलेल्या माहितीनुसार सरकारच्या वतीनं कामाच्या ठिकाणी असणारी वेळ अर्थात कार्यालयीन आठवडा 70 किंवा 90 तासांचा करण्याचा कोणताही विचार नाही. 'कामाचे तास 70 किंवा 90 तासांवर नेण्याचा कोणताही प्रस्ताव केंद्र शासनाच्या विचाराधीन नाही' अशी स्पष्ट माहिती कामगार व रोजगार राज्यमंत्री शोभा करंदलाजे यांनी दिली. 

लेखी स्पष्टीकरणपर उत्तरामध्ये केंद्र शासनाच्या वतीनं माहिती देत करंदलाजे यांनी कामगार हा विषय केंद्र आणि राज्य शासनाच्या समवर्ती सूचीत येत असल्याचं सांगत कामगार कायद्यांची अंमलबजावणी राज्य, केंद्रशासनाच्या अधिकारक्षेत्रात होत असून, अनेक उद्योग आणि कॉर्पोरेट कंपन्या कायद्याच्या नियमावलीनुसार काम करतात. 

हेही वाचा : आम्ही न्यायासाठी लढतोय - वैभवी देशमुख

दरम्यान, केंद्रीय अर्थसंकल्प सादर करण्यापूर्वी मांडण्यात आलेल्या आर्थिक अहवालात नमूद करण्यात आल्यानुसार नोकरीच्या ठिकाणी आठवड्याला 60 तासांहून अधिक काळ काम करण्याचा आरोग्यावर वाईट परिणाम होऊ शकतो. एकाच ठिकाणी तासन् तास बसल्यामुळं व्यक्तीच्या मानसिक आरोग्यावर याचा परिणाम होऊ शकतो. किंबहुना एकाच डेस्कवर दिवसाच्या 12 तासांहून अधिक काळ बसल्यानं व्यक्ती ताणतणावाचा सामना करताना दिसतात. 

कामाचे तास उत्पादकतेच्या निकषांपैकी एक असले तरीही आठवड्यातून 55 ते 60 तास काम केल्यास त्याचा आरोग्यावर होणारा गंभीर परिणाम दुर्लक्षित ठेवता येत नाही. अश्या प्रकारचे स्पष्टीकरण देण्यात आले असून कार्यालयीन आठवडा 70 किंवा 90 तासांचा करण्याचा कोणताही विचार नाही असे सांगण्यात आलेय.