Friday, May 24, 2024 08:47:36 AM

दीड वर्षात ३२०० पाळीव प्राण्यांचा विमान प्रवास

दीड वर्षात ३२०० पाळीव प्राण्यांचा विमान प्रवास

मुंबई, ९ मे २०२४, प्रतिनिधी : पाळीव प्राण्यांना विमानातून घेऊन जाऊ इच्छिणाऱ्या लोकांसाठी एक चांगली बातमी आहे. अकासा कंपनीने आता विमान प्रवासातील प्राण्यांच्या वजनाची मर्यादा वाढवली आहे. आजवर सात किलो वजनापर्यंत (पिंजऱ्यासकट) प्राणी नेण्यात अनुमती होती. त्यात आता वाढ करत ही वजनमर्यादा १० किलो केली आहे. प्राण्यांना विमान प्रवास करू देण्याची सेवा कंपनीने नोव्हेंबर २०२२ मध्ये सुरू केली होती. तेव्हापासून ३ हजार २०० प्राण्यांनी प्रवास केल्याने कंपनीला पावणे दोन कोटी रुपयांच्या आसपास महसूल मिळाल्याची माहिती आहे.

                 

सम्बन्धित सामग्री