Sunday, February 09, 2025 05:03:34 PM

Latur
लातूरमध्ये 4 हजार 200 कोंबड्यांच्या पिल्लांचा मृत्यू

लातूर जिल्ह्यामधील अहमदपूर तालुक्यातील ढाळेगाव येथे  4 हजार 200 कोंबड्याच्या पिल्लांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे

लातूरमध्ये 4 हजार 200 कोंबड्यांच्या पिल्लांचा मृत्यू

लातूर : लातूर जिल्ह्यामधील अहमदपूर तालुक्यातील ढाळेगाव येथे  4 हजार 200 कोंबड्याच्या पिल्लांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. कावळ्या पाठोपाठ कोंबड्यांचा मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे. लातूर जिल्ह्यात ही दुसरी घटना घडली आहे. या घटनेची पाहणी करण्यासाठी पशुसंवर्धन विभागाचे शीघ्र कृती दल घटनास्थळी दाखल झाले आहेत. 

जय महाराष्ट्र न्यूजच्या थेट संपर्कात राहण्यासाठी  व्हॉट्सअप चॅनेल वर क्लिक करा.

लातूर जिल्ह्यातील ढाळेगाव येथे बॉयलर कोंबड्यांच्या 4 हजार 200 पिल्लांचा अचानक मृत्यू झाल्याने एकच खळबळ उडाली असून पशुसंवर्धन विभागाचे शीघ्र कृती दल ढाळेगावात दाखल झाले आहेत. पशुसंवर्धन विभागाकडून मृत पिल्लांचे नमुने पुण्याच्या प्रयोगशाळेत पाठवण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे.मागील आठवड्यात उदगीर शहरातील उद्यानात तब्बल 100 कावळे दगावल्याने खळबळ माजली होती. या कावळ्यांचा मृत्यू 'बर्ड फ्लू' या आजाराने झाल्याचे निष्पन्न झाले होते. आता लातूरच्या अहमदपूर तालुक्यातील ढाळेगाव येथील सचिन गुळवे  यांच्या भगीरथी पोल्ट्री फार्ममध्ये तब्बल 4 हजार 200 बॉयलर कोंबड्यांच्या पिलांचा मृत्यू झाल्याने खळबळ माजली आहे. अचानक कोंबड्यांचा पिल्लांचा  मृत्यू कशामुळे झाला हे अद्याप स्पष्ट झाले नाही.

हेही वाचा : भाजपाकडून सरकारी कामांसाठी नवा पायंडा

मात्र उदगीरमधील उद्यानात 100 कावळे दगावले आणि त्यांचा मृत्यू बर्ड फ्लू या आजारामुळे झाल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे बॉयलर कोंबड्यांच्या मृत्यूने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. 


सम्बन्धित सामग्री