वर्धा : वर्धा जिल्ह्यातून धक्कादायक माहिती समोर आली आहे. वर्ध्याच्या वाघोलीतील जिल्हा परिषदेच्या उच्च प्राथमिक शाळेतील 57 विद्यार्थ्यांना पोषण आहारातून विषबाधा झाली होती. विद्यार्थांची प्रकृती ढासळल्याने हिंगणघाटच्या उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. या प्रकरणाची गंभीर दखल जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी घेतली. शाळेचे मुख्याध्यापक अरुण पोहाणे यांच्यावर निलंबनाची कारवाई केली करण्यात आली आहे.
मुदतबाह्य खाद्यतेल वापरल्याने विषबाधा
वर्धा जिल्ह्यातील वाघोलीतील जिल्हा परिषदेच्या उच्च प्राथमिक शाळेतील 57 विद्यार्थ्यांना विषबाधा झाल्याचा प्रकार उघड झाला आहे. जेवणासाठी मुदतबाह्य खाद्य तेलाचा वापर केल्याने विद्यार्थ्यांना विषबाधा झाल्याचे समोर येत आहे. या प्रकरणी वाघोली उच्च प्राथमिक शाळेच्या मुख्यध्यापकांचं निलंबन करण्यात आले आहे. ही कारवाई जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी केली आहे.