महाराष्ट्रात औरंगजेबाची कबर हटवण्याचा मुद्दा चांगलाच चर्चेत आलाय. त्यातच आता औरंगजेबाच्या कबरीवर आच्छादन टाकण्यास सुरुवात झालीय. पुरातत्व विभागाकडून तशा हालचाली देखील सुरु झाल्यात. हिंदुत्ववादी संघटनेच्या इशाऱ्यानंतर पुरातत्व विभाग कामाला लागल्याचं पाहायला मिळतंय. कबर परिसराला छावणीचं स्वरूप आल्याने सर्वत्र तणावाचं वातावरण पाहायला मिळतंय. कबरीच्या संरक्षणासाठी पुरातत्व विभाग कामाला लागलाय.
हेही वाचा: तो आला अन् त्याने..; मराठमोळी अभिनेत्रीसोबत नेमकं घडलं काय?
याबाबत अधिक माहिती अशी की, हिंदुत्ववादी संघटनेच्या इशाऱ्यानंतर छत नसलेल्या कबरीवर आच्छादन टाकण्याचा पुरातत्व विभागाकडून हालचाली सुरू असल्याची माहिती समोर आलीय.पुरातत्व विभागाच्या अधिकाऱ्यांकडून औरंगजेबाच्या कबरीची पाहणी देखील करण्यात आलीय. औरंगजेबाच्या कबरीला वरतून छत नसल्याने फेकलेली कुठलीही वस्तू तिथपर्यंत पोहोचू नये याची खबरदारी म्हणून अच्छादन लावण्याच्या हालचालींना वेग आलाय. गरज पडल्यास सुरक्षेच्या दृष्टिकोनातून कबरीवर अच्छादन लावण्यात येत आहे.
औरंगजेबाच्या कबरीवर सुरू असलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर येणाऱ्या पर्यटकांची संख्या घटली असल्याचं देखील पाहायला मिळतंय. कुणीही अफवावर विश्वास ठेवू नये, असे आवाहन कबरीची देखभाल करणाऱ्या सेवेकरांनी केलंय. दरम्यान कबर परिसराला आता छावणीचे स्वरूप प्राप्त झाले असून तणावाचे वातावरण पाहायला मिळतंय. कालपर्यंत मोठ्या संख्येने पर्यटक कबरीवर येत होते, मात्र आज बोटावर मोजण्या इतपतच पर्यटक दाखल होताय.