एकनाथ शिंदेंना आणखी एक धक्का; मित्रा संस्थेच्या उपाध्यक्षपदी नव्या चेहऱ्यांना संधी

राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना आणखी एक धक्का देण्यात आला आहे.

एकनाथ शिंदेंना आणखी एक धक्का; मित्रा संस्थेच्या उपाध्यक्षपदी नव्या चेहऱ्यांना संधी

मुंबई : राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना आणखी एक धक्का देण्यात आला आहे. 'मित्रा' संस्थेच्या नियमित मंडळावरुन अजय अशर यांना हटवण्यात आलं आहे. अजय अशर हे शिंदेंचे निकटवर्तीय आहेत. मित्रा संस्थेच्या उपाध्यक्षपदी  नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात आली आहे. दिलीप वळसे पाटील, आमदार राणा जगजितसिंह पाटील यांची नव्याने नियुक्ती करण्यात आली. नामनिर्देशित उपाध्यक्षांची संख्या दोनवरुन वाढवून तीन करण्यात आली आहे. 

एकनाथ शिंदे यांचे निकटवर्तीय मानले जाणारे अजय अशर यांना महाराष्ट्र इन्स्टिट्यूशन फॉर ट्रान्सफॉर्मेशन म्हणजेच मित्र संस्थेच्या नियमित मंडळावरून हटवले आहे. दिलीप वळसे पाटील, राणा जगजितसिंग पाटील, राजेश क्षीरसागर यांची नव्याने उपाध्यक्ष पदावर निवड करण्यात आली आहे. मुख्य सचिवांसह इतर महत्वाचे सिंचन संचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. याआधी एकनाथ शिंदे यांचे निकटवर्तीय अजय अशर हे या मित्र संचालक पद समितीत होते. आता पदावरून हटवले आहे. याआधी एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना एमएसआरडीसीच्या सह संचालकपदी नियुक्ती केलेल्या कैलास जाधव यांना सेवामुक्त केले होते. कैलास जाधव यांना तात्काळ सेवामुक्त करण्याचे आदेश सामान्य प्रशासन विभागाने काढले होते. निवृत्त झालेल्या जाधव यांच्या जागी वैदेही रानडे यांच्याकडे कार्यभार देण्याचे आदेश दिले होते. 

हेही वाचा : सतीश भोसलेच्या मुजोरीचा नवा व्हिडीओ समोर

शिंदेंच्या 'मित्रा'ला धक्का?

महाराष्ट्र इन्स्टिट्यूट फॉर ट्रान्सफॉर्मेशन संस्थेची पुनर्रचना करण्यात आली आहे. संस्थेच्या उपाध्यक्षपदी तिन्ही पक्षांचे नेते असणार आहेत. याआधी अजय अशर हे एकच उपाध्यक्ष होते. अजय अशर हे शिंदेंचे निकटवर्तीय बिल्डर आहेत. आता फडणवीसांचे विश्वासू प्रवीण परदेशी 'मित्रा'चे मुख्य कार्यकारी अधिकारी असणार आहेत. दिलीप वळसे पाटील, राणा जगजितसिंग पाटील, राजेश क्षीरसागर यांची नव्यानं निवड करण्यात आली आहे. देशातील नीती आयोगाच्या धर्तीवर 'मित्रा'ची स्थापना करण्यात आली आहे. राज्यातील आर्थिक गुंतवणूक वाढवण्यासाठी 'मित्रा'ची स्थापना करण्यात आली आहे. 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number