Thursday, March 20, 2025 03:14:11 AM

Cabinet decision: पालघरमधील देहरजी मध्यम पाटबंधारे प्रकल्पाच्या सुधारित खर्चास मान्यता

पालघर जिल्ह्यातील मौजे सुकसाळे (ता. विक्रमगड) येथील देहरजी मध्यम पाटबंधारे प्रकल्पाच्या 2 हजार 599 कोटी 15 लाख रुपयांच्या खर्चास सुधारित प्रशासकीय मान्यता देण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत

cabinet decision पालघरमधील देहरजी मध्यम पाटबंधारे प्रकल्पाच्या सुधारित खर्चास मान्यता

मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत मंत्रिमंडळ बैठक पार पडली. या बैठकीत वेगवेगळे मंत्रिमंडळ निर्णय घेण्यात आले. पालघर जिल्ह्यातील मौजे सुकसाळे (ता. विक्रमगड) येथील देहरजी मध्यम पाटबंधारे प्रकल्पाच्या 2 हजार 599 कोटी 15 लाख रुपयांच्या खर्चास सुधारित प्रशासकीय मान्यता देण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते. हा अतिरिक्त खर्च मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण- एमएमआरडीए करणार आहे.

हा प्रकल्प पाणी पुरवठा प्रकल्प म्हणून राबवण्यात येत आहे. या धरण प्रकल्पाबाबत मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण व कोकण पाटबंधारे विकास महामंडळ यांच्या दरम्यान 23 सप्टेंबर 2022 रोजी सामंजस्य करार करण्यात आला आहे. देहरजी नदीवरील 95.60 दलघमी क्षमतेचा हा प्रकल्प माती व संधानकातील संयुक्त धरण प्रकल्प असणार आहे. यातून वसई-विरार महानगरपालिका क्षेत्रासाठी 69.42 दलघमी पाणीसाठा पिण्याच्या पाण्यासाठी आरक्षित असणार आहे. याशिवाय एमएमआरडीएच्या इतर क्षेत्रास देखील पाणी उपलब्ध होणार असून, सुमारे चाळीस लाख लोकसंख्येचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सूटणार आहे. या प्रकल्पासाठी 2019 मध्ये 1 हजार 443 कोटी 72 लाख रुपयांची प्रथम सुधारित प्रशासकीय मान्यता देण्यात आली होती.


हेही वाचा : रायगडमध्ये जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीला शिवसेनेची दांडी; पालकमंत्री पदावरून शिवेसना-राष्ट्रवादीत शीतयुद्ध
 

आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत या प्रकल्पासाठी आता 2 हजार 599 कोटी 15 लाख रुपयांच्या खर्चास दुसरी प्रशासकीय मान्यता देण्यात आली. या अतिरिक्त खर्चाची आणि प्रकल्प येत्या तीन वर्षात पूर्ण करण्याची जबाबदारी एमएमआरडीए ची राहणार आहे.


सम्बन्धित सामग्री