Sunday, April 20, 2025 05:54:01 AM

धाराशिवमध्ये हिंदुत्ववादी संघटना आक्रमक

महाराष्ट्रात औरंगजेबाच्या कबरीवरून वातावरण चांगलेच तापलेय. त्यातच आता धाराशिवमधून धक्कादायक बातमी समोर येतेय. धाराशिवमध्ये एका समाजकंठकाने औरंगजेबाचा फोटो ठेवून स्टेटस ठेवले.

धाराशिवमध्ये हिंदुत्ववादी संघटना आक्रमक

महाराष्ट्रात औरंगजेबाच्या कबरीवरून वातावरण चांगलेच तापलेय. त्यातच आता धाराशिवमधून धक्कादायक बातमी समोर येतेय. धाराशिवमध्ये एका समाजकंठकाने औरंगजेबाचा फोटो ठेवून स्टेटस ठेवले. त्यात त्याने ‘बाप तो बाप रहेगा’ असे स्टेटस ठेवत हिंसाचार निर्माण करण्याचा प्रयत्न केलाय. यामुळे हिंदुत्वादी संघटाना आक्रमक झाल्याच पाहायला मिळालंय. यानंतर हिंदुत्ववादी संघटनांनी धाराशिवमध्ये रास्ता रोको केलं असल्याचं पाहायला मिळालंय. 

हेही वाचा:  महाराष्ट्रातील शाळांबद्दल राज्य सरकारचा मोठा निर्णय

याबाबत अधिक माहिती अशी की, औरंगजेबचा फोटो लावून ‘बाप तो बाप रहेगा’ असे स्टेटस ठेवल्यामुळे धाराशिवच्या उमरगा तालुक्यातील नारंगवाडी येथे हिंदू संघटनाकडून रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. उमरगा – लातूर महामार्गावर नारंगवाडी पाटीजवळ रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. आरोपीला तात्काळ अटक करण्याची मागणी हिंदुत्ववादी संघटनांकडून करण्यात आली होती. पोलिसांनी औरंगजेबाचे स्टेटस ठेवणाऱ्या आरोपीला ताब्यात घेतले आहे.

दरम्यान आधीच औरंगजेबाच्या कबरीबवरून राजकारण तापलेले असतांना धाराशिवमध्ये आणखीनच वातावरण तापल्याच पाहायला मिळतंय. दरम्यान या संपूर्ण प्रकरणानंतर हिंदुत्वादी संघटनांकडून आरोपीला अटक करण्याची मागणी करण्यात आली होती त्यानंतर पोलिसांनी आरोपीला अटक केलीय. यानंतर आता त्याच्यावर काय कारवाई होणार हे पाहणं महत्वाचं ठरणारे. 

           

सम्बन्धित सामग्री