Sunday, April 20, 2025 06:36:15 AM

नागपुरातल्या दंगलीत बांगलादेशाचा हात ?

नागपूरच्या दंगलीचे बांगलादेश कनेक्शन असल्याचा संशय व्यक्त झाला आहे.

नागपुरातल्या दंगलीत बांगलादेशाचा हात

नागपूर : औरंगजेबाची कबर हटवण्याच्या प्रकरणावरून नागपूरात हिंसाचार झाला. या प्रकरणातील आरोपीला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. मात्र नागपूरच्या दंगलीचे बांगलादेश कनेक्शन असल्याचा संशय व्यक्त झाला आहे.

बांगलादेशमध्ये सत्तापालट झाला. तिथलं लोकतांत्रिक सरकार जागतिक दबावात उलथवून टाकलं गेलं. त्यामागे जी शक्ती कार्यरत होती. तीच मंडळी भारतात मोदींच्या सरकारला हटवू पाहत आहे. त्यांना दंगल घडवण्यासाठी नागपूरची भूमी म्हणजे सर्वात सुपीक जागा.

नागपूर हिंसाचार प्रकरण झाले. यामुळे राज्यातील वातावरण तापले. यामुळे मायनॉरिटी डेमोक्रॅटिक पार्टीचा सय्यद असीम अली चर्चेत आला. सय्यद असीम अलीच्या हालचालींवर तपास यंत्रणांची नजर आहे. नागपूर हिंसाचारानंतर प्रमुख आंदोलकाला अटक पोलिसांकडून अटक करण्यात आली. फईम शईम खान असे त्याचे नाव आहे. फईम शईम खान अल्पसंख्यांक डेमोक्रेटीक पार्टीचा नागपूर अध्यक्ष आहे. पोलीस फईम शईम खानची भूमिका तपासत आहेत.  
हेही वाचा : आदित्यच्या समर्थनात उतरला सत्ताधाऱ्यांचा आमदार

कोण आहे फहीम शमीम खान?

फहीम शमीम खान हा नागपूर हिंसाचाराचा मास्टरमाईंड आहे. फहीम खानच्या सांगण्यावरूनच नागपूरच्या हिंसाचाराची सूत्र घडली असल्याचा संशय आहे. मायनॉरिटी डेमॉक्रॅटीक पार्टीचा शहर अध्यक्ष आहे. फहीम 38 वर्षांचा असून त्याचे शिक्षण दहावीपर्यंत झाले. त्याने राजकारणात प्रवेश केला आहे. विधानसभा निवडणूकीत त्याचा पराभव झाला. नितीन गडकरींविरोधात लोकसभा निवडणूकीतही त्याचा पराभव झाला. नागपूर हिंसाचारात 51 लोकांवर एफआयआर दाखल करण्यात आला आहे. एफआयआरच्या यादीत फहीम खानचं नाव आहे. फहीम खानला 21 मार्चपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. 


नागपूर दंगलीनंतर बांगलादेशातून समाज माध्यमात चिथावणीखोर पोस्ट पाहायला मिळाल्या. नवाज खान पठाण नामक व्यक्तीच्या अकाऊंटवर चिथावणीखोर भाषा वापरली गेली. नागपुरात आणखी दंगली होण्याची धमकी देण्यात आली आहे. बांगलादेश येथून फेसबुकवर नवाझने पोस्ट केली आहे. दंगल भडकण्यामागे अफवा मुख्यत्वे कारणीभूत आहे. नागपूर पोलिसांकडून परदेशी अकाउंट्सचा सखोल तपास केला जात आहे. 


सध्या बांगलादेशात काय घडत आहे? 

बांगलादेशात राजकीय अस्थिरता आहे. शेख हसिनांचे सरकार पश्चिमी देशांनी उलथवले. जॉर्ज सोरोस समर्थकांचा यामागे हात आहे. जॉर्ज सोरोस कट्टर मोदी विरोधक आहे. नागपूर दंगलीमागे कुणाचा हात याचा कसून तपास सुरु आहे. 


 


सम्बन्धित सामग्री