लातूर : पोलीस ठाण्याच्या गेटवर भिकाऱ्याची दगडाने ठेचून हत्या करण्यात आली. लातूर जिल्ह्यातील शिवाजीनगर पोलीस ठाण्याबाहेरील धक्कदायक घटना समोर आली आहे.
लातूरच्या शिवाजीनगर पोलीस स्टेशनच्या गेटवर एका भिकाऱ्याची दगडाने ठेचून हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. अत्यंत वर्दळीच्या ठिकाणी असलेल्या लातूर शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक परिसरात मध्यरात्री पोलीस स्टेशनच्या गेटवर आरोपीने एकाची दगडाने ठेचून हत्या केल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. या घटनेची माहिती शिवाजीनगर पोलिसांना सकाळी लागली आहे. मागील सहा महिन्यात लातूर जिल्ह्यामध्ये खूनाच्या घटना सर्रास घडत आहेत. आता पोलीस ठाण्याच्या दारातच एका भिकाऱ्याची हत्या झाल्याने लातूर शहरात खळबळ माजली आहे.
हेही वाचा : महालक्ष्मी मंदिरातील 51 तोळे दागिने चोरी प्रकरणातील सहा आरोपी जेरबंद
सध्या राज्यात खुनाच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. पोलिसांनी राज्यातील खुनाच्या घटनांकडे गांभीर्याने पाहणे गरजेचे आहे. लोकांना कायद्याचा धाकच उरला नाही.