Sunday, February 09, 2025 05:31:51 PM

Walmik Karad
वाल्मिक कराडसंदर्भात मोठी बातमी; केज कोर्टाने काय निर्णय दिला?

केज कोर्टातील सुनावणीत कराडवर मकोक लावण्यात आला.

वाल्मिक कराडसंदर्भात मोठी बातमी केज कोर्टाने काय निर्णय दिला

 

बीड : मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख प्रकरणात वालमिक कराडचा पाय आणखी खोलात गेला आहे. वाल्मिक कराडला देशमुख हत्या प्रकरणाशी संबंधित असलेल्या खंडणीच्या गुन्ह्यात अटक करण्यात आली होती. आज केज कोर्टात त्याला हजर करण्यात आले. यावेळी सरकारी वकिलांनी कोठडी वाढवून देण्याची मागणी केली. तर कराडच्या वकिलाने विरोध केला. केज कोर्टातील सुनावणीत कराडवर मकोक लावण्यात आला असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे वाल्मिक कराडचा आता संतोष देशमुख हत्या प्रकरणात आरोपी होण्याचा मार्ग मोकळा होणार आहे.  

जय महाराष्ट्र न्यूजच्या थेट संपर्कात राहण्यासाठी  व्हॉट्सअप चॅनेल वर क्लिक करा.

 

वाल्मिक कराडसंदर्भात मोठी बातमी समोर आली आहे. वाल्मिक कराडवर मकोक लावण्यात आल्याचे समोर आले आहे. केज कोर्टातून कराडला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. बीड सरपंच हत्येप्रकरणी केज कोर्टाकडून हा निर्णय देण्यात आला आहे.

कडेकोट बंदोबस्तात आज केज कोर्टात वाल्मिक कराडला हजर करण्यात आले. सरकारी वकिलांनी कराडची पोलीस कोठडी वाढवून देण्याची मागणी केली. सरकारी वकिलांनी म्हटले कि कराडने खंडणीची मागणी करत हातपाय तोडण्याची भाषा केली. कराड याची देशातील आणि देशाबाहेर संपत्ती जमवली आहे का याची चौकशी करायची असल्याचे सरकारी वकिलांनी सांगितले.

हेही वाचा : पुण्यात वाल्मिक कराडच्या पत्नीच्या नावे प्रॉपर्टी; नेमकं प्रकरण काय?

 

तर कराडच्या वकिलांनी पोलीस कोठडी वाढवून देण्याच्या मागणीला विरोध केला. चौकशीसाठी पोलिसांना 15 दिवसांची कोठडी पुरेशी होती. सर्व मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. आवाजाचा नमुना घेतला असल्याचे त्यांच्या वकिलांनी सांगितले. संपत्तीची माहिती घेण्यासाठी पोलिस कोठडीची गरज नाही. त्यामुळे न्यायालयीन कोठडी द्यावी अशी मागणी कराडच्या वकिलाने केली.

 

 

केज कोर्टातील युक्तिवाद

 

वाल्मिक कराडकडून वकील सिद्धेश्वर ठोंबरेंनी कोर्टात युक्तिवाद केला.  सरकारी वकील जे. बी. शिंदेंनी सीआयडीच्या बाजूने युक्तिवाद केला. सीआयडीकडून वाल्मिक कराडची 10 दिवसांच्या पोलीस कोठडीची मागणी करण्यात आली.  वाल्मिक कराडने कोणत्या गुन्ह्यातून संपत्ती कमावली, याचा तपास करण्यासाठी पोलीस कोठडी हवी असल्याचे सरकारी वकिलांनी सांगितले. कराडची भारतात किंवा भारताबाहेर  संपत्ती आहे का? याचा तपास करायचा आहे असेही सरकारी वकिलांनी म्हटले.

गेल्या 15 दिवसांपासून वाल्मिक कराड पोलिसांच्या ताब्यात आहे. बँक खात्याची चौकशी करण्यासाठी तंत्रज्ञान उपलब्ध आहे. सुदर्शन घुले आणि वाल्मिक कराड यांची एकत्र चौकशी करायची होती. मग तेव्हा दोघांची एकत्रित चौकशी का करण्यात आली नाही?  असे कराडच्या वकिलांनी म्हटले. पोलिसांनी 15 दिवसांत काय केले? कराड 15 दिवसांत त्यांनी काय सहकार्य केलं नाही का? आता वाल्मिक कराडच्या पोलिस कोठडीची गरज नसल्याचा मुद्दा कराडच्या वकिलांनी उपस्थित केला.


सम्बन्धित सामग्री