Sunday, April 20, 2025 04:52:02 AM

मोठी बातमी! औरंगजेबाच्या कबरीवरून नागपुरात मोठा राडा

नागपूरमध्ये तणावाचे वातावरण पाहायला मिळतंय. औरंगजेबाच्या कबरीच्या वादावरून दोन गटांमध्ये तणाव निर्माण झाला आहे. महाल परिसरामध्ये दोन गट आमने सामने आले आहेत.

मोठी बातमी औरंगजेबाच्या कबरीवरून नागपुरात मोठा राडा

नागपूर: नागपूरमध्ये तणावाचे वातावरण पाहायला मिळतंय. औरंगजेबाच्या कबरीच्या वादावरून दोन गटांमध्ये तणाव निर्माण झाला आहे. महाल परिसरामध्ये दोन गट आमने सामने आले आहेत. यामुळे परिसरात तणावाचे मोठे वातावरण निर्माण झालेय. सकाळी औरंगजेबाच्या कबरीविरोधात विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाकडून आंदोलन करण्यात आलं होतं. त्यानंतर आता औरंगजेबाच्या कबरीवरून नागपुरात मोठा राडा झाल्याचं पाहायला मिळतंय. 

दोन गटात दगडफेक झाल्यानंतर वाहनांची जाळपोळ झाली. या घटना घडल्यानंतर परिसरात पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. त्याचबरोबर नागरिकांमध्ये देखील भीतीचे वातावरण पाहायला मिळतंय. 

दरम्यान महाल परिसरामध्ये तणाव वाढल्यानंतर पोलिसांनी कडक बंदोबस्त तैनात केला आहे. जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांनी अश्रू धुराच्या नळकांड्या फोडल्या आहेत. औरंगजेबाच्या कबरीवरून आधीच वातावरण तापले असतांना आता नागपूरमध्ये मोठे वातावरण तापतांना दिसून येतंय. 


 


सम्बन्धित सामग्री