नुकतीच अहिल्यानगर येथे महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा पार पडली. यामध्ये पृथ्वीराज मोहोळ महाराष्ट्र केसरी झाला. दरम्यान पृथ्वीराज मोहोळ व शिवराज राक्षे यांची सेमी फायनलची कुस्तीची लढत अत्यंत चुरशीची झाली होती. त्यादरम्यान दोन्ही पाठीच्या बाजू जमिनीला टेकल्या नसताना देखील शिवराज राक्षे याला चुकीच्या पद्धतीने निकाल देण्यात आला. यावर डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. चंद्रहार पाटील यांनी आपल्या दोन्ही महाराष्ट्र केसरीच्या गदा कुस्तीगीर परिषदेला परत देण्याचा निर्णय घेतला आहे. सोमवारी, चंद्रहार पाटील यांनी अन्याय करणाऱ्या पंचाला गोळ्या घाला, माझ्यावर देखील असाच अन्याय केला होता, असे वक्तव्य केले होते.
कुस्तीमध्ये राजकारण करणाऱ्या लोकांना धडा शिकवला पाहिजे - चंद्रहार पाटील
डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांनी अतिशय मेहनतीने दोनदा महाराष्ट्र केसरी किताब मिळवला होता. परंतु तिसऱ्यांदा हा किताब मिळवताना त्यांना व्यवस्थेच्या बळी व्हावे लागले. त्यामुळे आपल मोठे नुकसान झालं असून मी नैराश्यात गेलो होतो. त्यावेळी मी आत्महत्या करण्याचे देखील ठरवलं होतं. परंतु काही सहकार्यामुळे मी ते पाऊल उचलले नाही. कुस्तीमध्ये राजकारण करणाऱ्या लोकांना धडा शिकवला पाहिजे, असे मत चंद्रहार पाटील यांनी व्यक्त केलं.
महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत नेमकं काय झालं?
महाराष्ट्रातील प्रतिष्ठित असलेल्या महाराष्ट्र केसरी या कुस्ती स्पर्धेची अंतिम लढत अहिल्यानगर येथे राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ तसेच अन्य प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडली. दरम्यान सेमी फायनलच्या लढतीत शिवराज राक्षे हा गेल्या दोन वेळा महाराष्ट्र केसरी झाला होता यावेळी जर तो महाराष्ट्र केसरी झाला असता तर शासनाच्या कोट्यातून त्याला डीवायएसपी ही पोस्ट मिळाली असती. परंतु, ज्यावेळी शिवराज राक्षे व पृथ्वीराज मोहोळ यांची लढत सुरू होती. त्यावेळी डाक या डावावर पृथ्वीराज मोहोळने चार गुण मिळवले होते. तथापि पंचांनी दोन्ही पाठीच्या बाजू एकावेळी जमिनीला चिकटल्यानंतरच चितपट घोषित केले जाते. हा आंतरराष्ट्रीय कुस्तीचा नियम मानला जातो. परंतु पंचांनी त्याची शहानिशा न करता पृथ्वीराज मोहोळ यांना विजयी घोषित केल्याने प्रतिस्पर्धी शिवराज राक्षेने पंचांचा निर्णयाचा राग अनावर न झाल्याने पंचाला लाथ मारली. (हेही वाचा -
चुकीचा निर्णय देणाऱ्या पंचांना गोळ्या घातल्या पाहिजेत - चंद्रहार पाटील
या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला. त्यामुळे हा शिवराज राक्षे यांच्यावर अन्याय झाला, अशी भूमिका चंद्रहार पाटील यांनी घेतली. चुकीचा निर्णय देणाऱ्या पंचांना गोळ्या घातल्या पाहिजेत माझ्यावर देखील असाच अन्याय करून माझ्या आयुष्यातील महत्त्वाच्या तिसऱ्या महाराष्ट्र केसरीच्या वेळी चुकीचे निर्णय दिले गेले होते. म्हणून मी नोकरीला लागू शकलो नाही अशी खंत डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांनी बोलून दाखवली.
शिवराज राक्षेला 3 वर्ष कुस्ती स्पर्धा खेळण्यावर बंदी -
शिवराज राक्षे यांच्यावर त्यांच्या कृत्याबाबत अहिल्यानगर येथील स्पर्धेदरम्यान सर्व पंचांनी तेथील मैदानावरच निषेध म्हणून आंदोलन केले. तसेच कॉलर पकडून लाथ मारणाऱ्या शिवराज राक्षेला शिक्षा करा असा पवित्रा घेतला. त्यावर कुस्ती परिषदेचे अध्यक्ष श्री रामदास तडस यांनी शिवराज राक्षे यास तीन वर्षाकरिता कुस्ती स्पर्धेत सहभाग घेता येणार नाही, अशा प्रकारची घोषणा केली.