Sunday, February 09, 2025 06:01:29 PM

Chhagan Bhujbal
छगन भुजबळांची नाराजी कायम

मंत्रिमंडळात वर्णी न लागल्यामुळे उघडपणे नाराजी व्यक्त करणारे राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी पुन्हा एकदा त्यांची नाराजी व्यक्त केली आहे.

छगन भुजबळांची नाराजी कायम

मुंबई : मंत्रिमंडळात वर्णी न लागल्यामुळे उघडपणे नाराजी व्यक्त करणारे राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी पुन्हा एकदा त्यांची नाराजी व्यक्त केली आहे. शिर्डीत सुरू असलेल्या पक्षाच्या अधिवेशनाला भुजबळांनी हजेरी लावली पण तब्येतीचे कारण सांगून अवघ्या दोन तासांत ते तेथून परतले.

जय महाराष्ट्र न्यूजच्या थेट संपर्कात राहण्यासाठी  व्हॉट्सअप चॅनेल वर क्लिक करा.

मंत्रिमंडळातून डच्चू मिळाल्याने भुजबळांनी पक्षाच्या नेत्यांविरोधात उघडपणे नाराजी व्यक्त केली होती. त्यांना जाणिवपूर्वक डावलले जातेय, असा थेट आरोप त्यांनी अजित पवार यांचे नाव न घेता केला होता.

 

भुजबळांची नेमकी नाराजी काय?

'जहाँ नहीं चैना, वहाँ नहीं रेहना'- भुजबळांची पहिली सूचक प्रतिक्रिया

राष्ट्रवादीचे  ज्येष्ठ नेते, माजी मंत्री आणि अनेक खात्यांचा अनुभव असूनही भुजबळांना डावललं 

विधानसभेआधी त्यांनी राज्यसभेची इच्छा व्यक्त केली होती

तेव्हा त्यांनी तुमची विधानसभेला अधिक आवश्यकता असल्याचे सांगितले

पक्षाच्या आदेशाने भुजबळ लढले आणि जिंकलेही, त्यानंतर त्यांना पुन्हा राज्यसभेचे गाजर दिलं

राज्यसभेवर जाण्यासाठी भुजबळांचा विधानसभेचा राजीनामा देण्यास नकार

मराठा- ओबीसी संघर्षावेळी त्यांनी राजीनाम्याची तयारी दाखवली होती

मात्र, पक्षाने त्यांना राजीनामा देवू दिला नाही

पक्षाने सतत भूमिका बदलत ठेवल्याने मतदारसंघातील लोकांशी प्रतारणा होईल असं भुजबळांनी सांगितले

मंत्रिपद न मिळाल्याने भुजबळांची अजित पवार यांच्याविरोधात उघड नाराजी

तेव्हापासून भुजबळ पक्षाच्या नियमित कामकाजापासून अलिप्त राहिलेत

शिर्डी अधिवेशनात ते अन्य नेत्यांच्या आग्रहास्तव गेले मात्र, काही तासातच परतले

हेही वाचा : एस. टी महामंडळ दरवर्षी स्वमालकीच्या 5 हजार लालपरी बसेस खरेदी करणार

 

पक्षाचे नेते सुनिल तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांनी भुजबळांची मनधरणी करण्याचा प्रयत्न केला. मात्र दुखावलेल्या भुजबळांनी त्यांची नाराजी सोडली नाही.

 

राष्ट्रवादीत सध्या सर्व काही आलबेल नाही, अशीच सुत्रांची माहिती आहे. सध्या धनंजय मुंडे यांच्याबाबतची राजकीय चर्चा जोरदार चर्चा सुरू आहे. राष्ट्रवादीने मुंडेंचा राजानामा घ्यावा, अशी मागणी होत असताना पक्षाच्या नेत्यांनी त्याबाबत कोणताही ठोस निर्णय घेतलेला नाही. मुंडेंचा विषय पक्षासाठी अडचणीचा ठरू पाहतोय. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महायुतीतील सर्व आमदारांची बैठक घेतली त्यालाही मुंडे गैरहजर होते. आता अधिवेशनालाही मुंडेंनी आजाराचे कारण सांगत अधिवेशनाला न येता परळीतच थांबणे पसंत केले. भुजबळ आणि मुंडे हे दोन्ही विषय सध्या राष्ट्रवादीसाठी डोकेदुखी ठरलेत. दोन्ही नेते ओबीसी समाजाचं प्रतिनिधीत्व करतात, त्यामुळे याबाबतीत राष्ट्रवादीला ताकही फुंकून प्यावं लागणार आहे.


सम्बन्धित सामग्री