Monday, June 23, 2025 06:06:45 AM

मुख्यमंत्र्यांची नवी मुंबईत प्रचारफेरी

ठाणे लोकसभा मतदार संघाचा प्रचार अंतिम टप्प्यात आला असून प्रचाराचा जोर वाढला आहे. शिवसेनेचे उमेदवार नरेश मस्के यांच्या प्रचारार्थ एकनाथ शिंदे नवी मुंबईमध्ये येणार आहेत.

मुख्यमंत्र्यांची नवी मुंबईत प्रचारफेरी 

नवी मुंबई, १७ मे २०२४, प्रतिनिधी : ठाणे लोकसभा मतदार संघाचा प्रचार अंतिम टप्प्यात आला असून प्रचाराचा जोर वाढला आहे. शिवसेनेचे उमेदवार नरेश मस्के यांच्या प्रचारार्थ एकनाथ शिंदे नवी मुंबईमध्ये येणार आहेत.
शुक्रवारी शिवसेनेचे उमेदवार नरेश म्हस्के यांच्या प्रचारार्थ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची पाठ यात्रा होणार आहे. ऐरोली विधानसभा क्षेत्रात वाशी ते ऐरोली पर्यंत ही पथयात्रा आणि शक्तिप्रदर्शन होणार आहे. ठाणे लोकसभा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासाठी प्रतिष्ठेची आहे त्यामुळे ही जागा शिवसेनेकडे यावी यासाठी मुख्यमंत्री शिंदे यांनी सुद्धा कंबर कसली आहे. 
ठाणे मतदारसंघात शिवसेनेचे नरेश म्हस्के विरुद्ध शिउबाठाचे राजन विचारे यांच्यात लढत पाहायला मिळणार आहे. देशभरात २० मे रोजी पाचव्या टप्प्यातील मतदान पार पडणार आहे. पाचव्या आणि शेवटच्या टप्प्यात महाराष्ट्रातील धुळे, दिंडोरी, नाशिक, पालघर, भिवंडी, कल्याण, ठाणे, मुंबईतील सहा मतदारसंघात मतदान पार पडणार आहे.


सम्बन्धित सामग्री