Friday, April 25, 2025 08:21:02 PM

Disha Salian Case: दिशा सालियन प्रकरणावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये खडाजंगी

सेलिब्रिटी मॅनेजर दिशा सालियन मृत्यू प्रकरण पाच वर्षांनंतर आता पुन्हा चर्चेत आले आहे.

disha salian case दिशा सालियन प्रकरणावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये खडाजंगी

मुंबई : सेलिब्रिटी मॅनेजर दिशा  सालियन मृत्यू प्रकरण पाच वर्षांनंतर आता पुन्हा चर्चेत आले आहे. दिशा  सालियनचे वडिल सतीश सालियान यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल मुलीच्या मृत्यूची पुन्हा चौकशी करण्याची मागणी केली. ही याचिका बुधवारी दाख करण्यात आली. 

सामूहिक बलात्कार करून दिशाची हत्या करण्यात आल्याचा आरोप याचिकेत केला आहे. आमदार आदित्या ठाकरे यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी याचिकेतून करण्यात आली आहे. यासह सीबीआय चौकशीचीही मागणी करण्यात आल्याने हे प्रकरण सध्या चर्चेत आहे. 

दरम्यान दिशा  सालियन प्रकरणावर आदित्य ठाकरे यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली आहे. गेल्या पाच वर्षापासून माझ्या बदनामीचा प्रयत्न सुरू असल्याची टीका त्यांनी सत्ताधाऱ्यांवर केली आहे. या प्रकरणाचे पडसाद अर्थसंकल्पात उमटलेले पाहायला मिळत आहेत. सत्ताधारी आणि विरोधी पक्षातील आमदारांनी या प्रकरणावर भाष्य केले आहे. 

हेही वाचा : दिशा सालियान प्रकरण गंभीर वळणावर; वडिलांची न्यायालयात धाव

कोण आहे दिशा सालियान? 
दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूत यांची माजी व्यवस्थापक म्हणून दिशा  सालियन मुंबईत काम करत होती. ८ जून  २०२० रोजी मुंबईत सालियनचा बाल्कनीतून पडून मृत्यू झाला. पोलिसांनी ही आत्महत्या असल्याची नोंद केली. 

दिशा सालियन प्रकरणावर बोलताना आदित्य ठाकरे यांची चुप्पी का? तसेच आदित्य ठाकरेंनी नैतिकतेच्या आधारे राजीनामा द्यावा अशी मागणी बंदरे व मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे केली आहे. दिशा सालियन प्रकरणावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार खडाजंगी होत आहे. विरोधी पक्षनेते आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे म्हणाले की, दिशा सालियान प्रकरण हे न्याय प्रविष्ट आहे. न्यायालय यावर योग्य तो निर्णय देईल. शिळ्या कढीला ऊत आणण्याचा प्रयत्न भाजपचा आहे. न्यायालय या याचिकेत काय निर्णय घेतेय हे पाहण महत्त्वाचं ठरणार आहे.

दिशाच्या वडिलांनी याचिकेत काय म्हटलं? 
दिशाचा मृत्यू हा अपघाती झाला असं भासवण्यात आलं मात्र तिचा मृत्यू नसून तिच्यावर सामूहिक बलात्कार करून तिची हत्या करण्यात आली आहे. माजी महापौर, मालवणी पोलीस ठाण्यातील अधिकारी सांगत असेलली गोष्ट खरी असल्याची भासवत होते. याच लोकांनी माझ्या कुटुंबाला दबावाखाली आणि नजरकैदेत ठेवलं होतं. आमच्या प्रत्येक हालचालींवर त्यांची नजर होती. दिशा सालियन मृत्यूप्रकरणी महाराष्ट्राबाहेर सुनावणी घ्या. 8 जून 2020ला दिशाच्या घरी झालेली पार्टी होती. आदित्य ठाकरेंसह सूरज पांचोली, दिनो मोर्यावरही याचिकेतून गंभीर आरोप करण्यात आले. दिशाचा सामूहिक बलात्कार करून खून करण्यात आला. बलात्काराचा उल्लेख शवविच्छेदन अहवालातून गायब आहे. दिशा करिअरसाठी खूप गंभीर होती, आत्महत्या करणंच शक्य नाही. दिशाचा मृत्यू अपघाती झाल्याचं भासवण्यात आलं. माजी महापौर किशोरी पेडणेकरांकडून राजकीय दबाव आणला गेला. सामुहिक बलात्कार आणि हत्या दडपण्यासाठी साक्षी पुरावे, न्यायवैद्यक अहवाल, शवविच्छेदन अहवाल बनावट तयार केले गेले. दिशाचा मृतदेह बंद दाराआडून हलवून तो बाहेर फेकून 14 व्या मजल्यावरून उडी घेऊन आत्महत्या केल्याचं दाखवलं. दिशाच्या मृतदेहावर घटनेशी साधर्म्य दाखवणाऱ्या कुठल्याही खुणा नव्हत्या. गँगरेपच्या खुणा मिटवण्यासाठीच मुंबई पोलिसांनी दिशाच्या मृतदेहाचं शवविच्छेदन करण्यास 50 तासांचा उशिर केला. निष्पक्ष कारवाई होण्यासाठी तपास अधिकारी म्हणून समीर वानखेडेंची नेमणूक करावी असं सतिश सालियान यांनी याचिकेत म्हटले आहे. 


सम्बन्धित सामग्री