अजित पवारांच्या दौऱ्यात धनंजय मुंडे गैरहजर

महाराष्ट्रात नेहमीच अनेक राजकीय घडामोडी घडत असतात. त्यातच आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वक्तव्याने चर्चेला उधाण आलंय. उपमुख्यमंत्री अजित पवार हे बीड दौऱ्यावर होते.

अजित पवारांच्या दौऱ्यात धनंजय मुंडे गैरहजर

बीड: महाराष्ट्रात नेहमीच अनेक राजकीय घडामोडी घडत असतात. त्यातच आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वक्तव्याने चर्चेला उधाण आलंय. उपमुख्यमंत्री अजित पवार हे बीड दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी असे वक्तव्य केले की सर्वत्र चर्चेला उधाण आले. पुणे जिल्ह्याच्या पालकत्वाबरोबरउपमुख्यमंत्री अजित पवार यांनी  बीड जिल्ह्याचेही पालकत्व स्वीकारल्याने त्यांच्या स्वागतासाठी बीडमधील नेत्यांनी मोठी गारदी केली होती. विशेष म्हणजे धनंजय मुंडे अजित पवार यांच्या दौऱ्यात गैरहजर होते. यावेळी त्यांनी अनेकांवर निशाणा साधल्याच पाहायला मिळतंय. 

हेही वाचा: वक्फ विधेयक संसदेत सादर; काय म्हणाले किरेन रिजिजू?

काय म्हणाले अजित पवार? 
राखेच्या, वाळूच्या आणि अशा बऱ्याच टोळ्या बीडमध्येच आहेत. या सगळ्या टोळ्यांना सुतासारखे सरळ करायचे आहे. मागच्या तुलनेमध्ये कामाचा वेग वाढलेला दिसतो आहे पण मागील तक्रारींच्या पार्श्वभूमीवर रस्ताच न करता जो बील काढेन, त्याला सोडणार नाही. मला पै-पै चा हिशेब लागला, अशी ताकीद उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बीडच्या कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांना दिली.

त्याचबरोबर कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांनी चांगल्या सवयी लावून घेतल्या पाहिजेत. स्वच्छतेचा आग्रह धरला पाहिजे. मला भेटायला येताना हार, टोपी, पुष्पगुच्छ, स्मृतिचिन्हे काही आणू नका. आई वडिलांच्या कृपेने आणि माझ्या चुलत्यांच्या कृपेने माझे अतिशय उत्तम सुरू आहे. माझ्या पाया देखील पडू नका. आजचे पुढारी पाया पडण्याच्या लायकीचे नाहीत. आई-वडिलांच्या आणि गुरूंच्या पाया पडा. मला केवळ प्रेमाचा नमस्कार करा, मला तेवढंच पुरेसे आहे, असे अजित पवार म्हणाले.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number