मुंबई : महायुती सरकार स्थापन झाल्यानंतर त्यातील घटक पक्षांचे नाराजीनाट्य संपता संपेनात अशी परिस्थिती आहे. मंत्रिमंडळात वर्णी लागली नाही म्हणून भाजपासह शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे नाराजीची सूर आळवला. शिवसेनेतील नाराजीनाट्य उघडपणे चव्हाट्यावर आली आहे. माजी मंत्री तानाजी सावंत यांची मंत्रिमंडळात वर्णी न लागल्याने त्यांनी शिवेसनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीदिनी झालेल्या शिवोत्सव सोहळ्याला दांडी मारली.
हेही वाचा : Padma Awards 2025 : प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला केंद्र सरकारकडून पद्म पुरस्काराची घोषणा
शिवसेना नेत्यांची नाराजी
मंत्रिमंडळात वर्णी न लागल्याने तानाजी सावंत नाराज आहेत. नाराजीमुळे सावंत हिवाळी अधिवेशनातही फारसे दिसले नाहीत. मुंबईत झालेल्या शिवोत्सव सोहळ्यालाही सावंतांची दांडी पाहायला मिळाली. धाराशिवचे पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्या स्वागतलाही त्यांनी दांडी मारली होती. तानाजी सांवत पक्षाच्या अनेक बैठकांना गैरहजर असल्याचे दिसून आले. सावंतांच्या नाराजीची परंडा मतदारसंघात जोरदार चर्चा आहे.
जय महाराष्ट्र न्यूजच्या थेट संपर्कात राहण्यासाठी व्हॉट्सअप चॅनेल वर क्लिक करा.
शिवसेना पक्ष फुटीनंतर आमदार तानाजी सावंत यांनी एकनाथ शिंदे यांच्याबरोबर जाण्याचा निर्णय घेतला होता. त्यांनी दिलेली साथ पाहता शिंदेंनी त्यांना त्यांच्या कार्यकाळात आरोग्य खात्याची जबाबदारी दिली होती. तसेच धाराशिव जिल्ह्याचे पालकमंत्रीपदही दिले होते. मात्र आत्ताच्या महायुती सरकारमध्ये त्यांची वर्णी न लागल्याने त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. दुसरीकडे पालकमंत्रीपद न मिळाल्याने मंत्री भरत गोगावलेही नाराज आहेत. त्यांच्या समर्थकांनी त्याविरोधात जोरदार निदर्शने केली होती. या सर्व पार्श्वभूमीवर शिवसेनेत अंतर्गत सुरू असलेली धूसफूस दूर करण्याचे आव्हान एकनाथ शिंदे यांच्यासमोर आहे.