महाराष्ट्र: तुम्ही जर वाहन वापरात असाल तर आता तुमच्यासाठी एक मोठी बातमी समोर आलीय. वाहन आणि वाहनधारकांसाठी महत्वाची ही बातमी आहे. 1 एप्रिल 2025 पासून वाहनांसाठी फास्ट- टॅग अनिवार्य करण्यात आलेय. यामुळे वाहतुकीवर सकारात्मक परिणाम होणार असल्याच बोललं जातंय. महाराष्ट्र सरकारने हा निर्णय घेतला असून यामुळे वाहनधारकांचा वेळ वाचणार असल्याचं देखील बोललं जातंय.
फास्ट- टॅग म्हणजे काय?
फास्टटॅग हे एक इलेक्ट्रॉनिक टोल संग्रहण प्रणाली आहे, ज्यामुळे वाहनधारकांना टोल नाक्यांवर वेळ वाचवता येतो. यामध्ये वाहनांच्या विंडस्क्रीनवर एक छोटासा चिप असतो, जो टोल नाक्यावर स्वयंचलितपणे वाचन करतो. फास्टटॅगद्वारे वाहनधारकांना अनेक फायदे मिळतात.
जय महाराष्ट्र न्यूजच्या थेट संपर्कात राहण्यासाठी व्हॉट्सअप चॅनेल वर क्लिक करा.
काय आहेत फास्ट- टॅगचे फायदे?
1.फास्ट- टॅगसह वाहन चालवणे अधिक वेगाने होते. टोल नाक्यावर थांबण्याची आवश्यकता नाही, कारण फास्टटॅगद्वारे त्वरित पैसे कापले जातात. यामुळे लांब रांगा आणि अडचणी टळतात.
2.फास्ट- टॅग वापरणाऱ्यांना सरकारकडून विशेष सूट देखील मिळते. शहरी आणि राष्ट्रीय महामार्गांवर वाहतुकीचा वेग वाढवता येतो, ज्यामुळे प्रवास वेळेत संपतो आणि इंधनाची बचत होते.
3.सर्व टोल नाक्यांवर फास्ट- टॅग आवश्यक आहे, ज्यामुळे विविध प्रकारच्या रांगा आणि लांब लांब थांबणे टाळता येते. यामुळे एकाच वेळी बहुतेक वाहने सुरक्षितपणे आणि जलद मार्गावरून जातात.
4.फास्ट- टॅगचा वापर देशभरात एकसारखा आहे, म्हणून वाहनधारकांना एकाच प्रकारच्या सिस्टममध्ये सर्व टोल नाक्यांवर सुविधेचा लाभ घेता येतो.
5. हे डिजिटल पेमेंटचे एक उत्कृष्ट उदाहरण आहे, कारण इथे पारंपारिक पैशांच्या वापराची आवश्यकता नाही. सर्व व्यवहार ऑनलाइन होतात, आणि यामुळे फसवणूक आणि भ्रष्टाचार टाळता येतो.