Saturday, November 15, 2025 06:02:08 PM

गडकरी आणि आदित्य मैदानात

शुक्रवारी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि आदित्य नाशिक दौऱ्यावर आहेत. महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ  नितीन गडकरी सभा घेणार आहेत  तर, आदित्य ठाकरेही  महाविकास आघाडीच्या उमेदवारांसाठी मैदानात उतर

गडकरी आणि आदित्य मैदानात 
gadkari, aditya

नाशिक, १७ मे २०२४, प्रतिनिधी : शुक्रवारी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि आदित्य नाशिक दौऱ्यावर आहेत. महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ  नितीन गडकरी सभा घेणार आहेत  तर, आदित्य ठाकरेही  महाविकास आघाडीच्या उमेदवारांसाठी मैदानात उतरले आहेत. 
महायुतीचे उमेदवार हेमंत गोडसे आणि भारती पवार यांच्या प्रचारार्थ केंद्रीय मंत्री नितीन गडकरी सभा घेणार आहेत. तर, महाविकास आघाडीचे उमेदवार राजाभाऊ वाजे आणि भास्कर भगरे यांच्या प्रचारार्थ आदित्य ठाकरे मैदानात उतरले आहेत. नाशिक मतदारसंघात शिवसेनेचे हेमंत गोडसे आणि शिउबाठाचे राजाभाऊ वाजे यांच्यात लढत होणार आहे. तर, दिंडोरी मतदारसंघात भाजपकडून भारती पवार विरुद्ध राशपचे भास्कर भगरे अशी प्रमुख लढत आहे. 
देशभरात २० मे रोजी पाचव्या टप्प्यातील मतदान पार पडणार आहे. पाचव्या आणि शेवटच्या टप्प्यात महाराष्ट्रातील धुळे, दिंडोरी, नाशिक, पालघर, भिवंडी, कल्याण, ठाणे, मुंबईतील सहा मतदारसंघात मतदान पार पडणार आहे. प्रचारासाठी शेवटचा एक दिवस उरल्याने मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी उमेदवारांकडून वेगाने प्रचार सुरू आहे. 
 


सम्बन्धित सामग्री