मुंबई: मुंबई ही स्वप्ननगरी म्हणून ओळखली जाते. याच स्वप्ननगरीमध्ये आपलं एक स्वतःच आणि हक्काचं घर असावं असं सर्वांचाच स्वप्न असत. त्यातच आता मुंबईकरांसाठी मोठी आणि आनंदाची बातमी समोर येतेय. बीएमसी कर्मचाऱ्यांचे घर खरेदी करण्याचं स्वप्न लवकरच पूर्ण होणार आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, मुंबई महापालिकेच्या तृतीय आणि चतुर्थ श्रेणीत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. मुंबई महापालिका प्रशासनाने म्हाडाच्या धर्तीवर घरे विकण्याचा निर्णय घेतलाय. आता १२ लाखांत आपल्याला स्वत: चे घर खरेदी करता येणार आहे.
हेही वाचा: अंजली दमानियांनी दिला शरद पवारांना सल्ला
मुंबई महापालिकेच्या तृतीय आणि चतुर्थ श्रेणीत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांठी पालिका प्रशासनाने म्हाडाच्या धर्तीवर घरे विकण्याचा निर्णय घेतलाय. मुंबईच्या माहुल परिसरात ४,७०० घरे बांधण्यात आली आहे. या घरांची किंमत 12 लाख 60 हजार रूपये इतके असून, ही घरे लॉटरीच्या माध्यमातून विकली जाणार आहेत. या घरांसाठी महापालिका कर्मचाऱ्यांना सोमवारपासून अर्ज करता येणार आहे.
दरम्यान मुंबईकरांसाठी मोठी आणि आनंदाची बातमी समोर आली असून बीएमसी कर्मचाऱ्यांचे घर खरेदी करण्याचं स्वप्न लवकरच पूर्ण होणार आहे.मुंबई महापालिकेच्या तृतीय आणि चतुर्थ श्रेणीत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी ही आनंदाची बातमी असून मुंबई महापालिका प्रशासनाने म्हाडाच्या धर्तीवर घरे विकण्याचा निर्णय घेतलाय. आता 12 लाखांत आपल्याला स्वत: चे घर खरेदी करता येणार असल्याने आनंदाचे वातावरण पाहायला मिळतंय.