Sunday, April 27, 2025 06:04:21 PM

आदित्य ठाकरेंना वाचवण्यासाठी कितीची डील झाली?, दिशा सालियन प्रकरणावर वकील ओझांनी केला सवाल

दिशा सालियनच्या वडिलांनी मुंबई पोलीस आयुक्तांची भेट घेतली. दिशा सालियनच्या वडिलांनी आदित्य ठाकरेंवर एफआयआर दाखल करण्याची मागणी केली.

आदित्य ठाकरेंना वाचवण्यासाठी कितीची डील झाली दिशा सालियन प्रकरणावर वकील ओझांनी केला सवाल

मुंबई : दिशा सालियन प्रकरण मागील काही दिवसांपासून पुन्हा आले आहे. दिशा सालियनचे वडिल सतीश सालियन यांनी तिची आत्महत्या नसून हत्या असल्याचे याचिका न्यायालयात दाखल केली. यानंतर आज दिशा सालियनच्या वडिलांनी मुंबई पोलीस आयुक्तांची भेट घेतली. दिशा सालियनच्या वडिलांनी आदित्य ठाकरेंवर एफआयआर दाखल करण्याची मागणी केली. तशी लेखी तक्रार सतीश सालियन यांनी आयुक्तांकडे दिले. ड्रग्स व्यापारात आदित्य ठाकरेंचा सहभाग असल्याचे वकील निलेश ओझा यांनी म्हटले आहे. 

दिशा सालियनच्या वडिलांनी पोलीस आयुक्तांची भेट घेतली. त्यांनी ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांच्यावर एफआयआर दाखल करण्याची मागणी केली. तसेच त्यांनी परमबीर सिंह, सचिन वाझेलाही सहआरोपी करण्याची मागणी केली आहे. यासंदर्भात त्यांनी आयुक्तांकडे लेखी तक्रार केली. परमबीर सिंह आरोपींना पाठिशी घालत होते. ड्रग्स व्यापारात आदित्य ठाकरेंचा सहभाग होता. दिशाच्या हत्येत आदित्य ठाकरेंसह सूरज पांचोली, सचिन वाझेचा सहभाग असल्याचा खळबळजनक खुलासा वकील निलेश ओझा यांनी केला आहे. दिशा सालियन प्रकरणाची केस वकील निलेश ओझा यांच्याकडे आहे. 

हेही वाचा : प्रशांत कोरटकरला सात दिवसांची पोलीस कोठडी मिळणार?

केस ओपन करण्याची मागणी 2023 लाच केली होती. उद्धव ठाकरे देखील आरोपी आहेत. आदित्य ठाकरेंना वाचवण्यासाठी कितीची डील झाली? असा सवाल वकील ओझा यांनी केला आहे. दिशाचा मृत्यू अपघाती नव्हता. दिशा मृत्यू प्रकरणात आदित्य ठाकरे दोषी आहेत. आदित्य ठाकरेंची अटक कोणी रोखली ते तपासा असे ओझा यांनी म्हटले आहे. दिशा सालियन प्रकरणात वकील ओझा यांनी पोलिसात तक्रार दाखल केली आहे. 

सतीश सालियन यांनी दाखल केलेली याचिका

दिशाचा मृत्यू हा अपघाती झाला असं भासवण्यात आलं मात्र तिचा मृत्यू नसून तिच्यावर सामूहिक बलात्कार करून तिची हत्या करण्यात आली आहे. माजी महापौर, मालवणी पोलीस ठाण्यातील अधिकारी सांगत असेलली गोष्ट खरी असल्याची भासवत होते. याच लोकांनी माझ्या कुटुंबाला दबावाखाली आणि नजरकैदेत ठेवलं होतं. आमच्या प्रत्येक हालचालींवर त्यांची नजर होती. दिशा सालियन मृत्यूप्रकरणी महाराष्ट्राबाहेर सुनावणी घ्या. 8 जून 2020ला दिशाच्या घरी झालेली पार्टी होती. आदित्य ठाकरेंसह सूरज पांचोली, दिनो मोर्यावरही याचिकेतून गंभीर आरोप करण्यात आले. दिशाचा सामूहिक बलात्कार करून खून करण्यात आला. बलात्काराचा उल्लेख शवविच्छेदन अहवालातून गायब आहे. दिशा करिअरसाठी खूप गंभीर होती, आत्महत्या करणंच शक्य नाही. दिशाचा मृत्यू अपघाती झाल्याचं भासवण्यात आलं. माजी महापौर किशोरी पेडणेकरांकडून राजकीय दबाव आणला गेला. सामुहिक बलात्कार आणि हत्या दडपण्यासाठी साक्षी पुरावे, न्यायवैद्यक अहवाल, शवविच्छेदन अहवाल बनावट तयार केले गेले. दिशाचा मृतदेह बंद दाराआडून हलवून तो बाहेर फेकून 14 व्या मजल्यावरून उडी घेऊन आत्महत्या केल्याचं दाखवलं. दिशाच्या मृतदेहावर घटनेशी साधर्म्य दाखवणाऱ्या कुठल्याही खुणा नव्हत्या. गँगरेपच्या खुणा मिटवण्यासाठीच मुंबई पोलिसांनी दिशाच्या मृतदेहाचं शवविच्छेदन करण्यास 50 तासांचा उशिर केला. निष्पक्ष कारवाई होण्यासाठी तपास अधिकारी म्हणून समीर वानखेडेंची नेमणूक करावी असं सतिश सालियन यांनी याचिकेत म्हटले आहे. 


सम्बन्धित सामग्री