Monday, September 16, 2024 08:10:56 AM

How much voting in the state?
राज्यात कुठे किती मतदान ?

राज्यातील लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या आणि‍ शेवटच्या टप्प्यातील १३ लोकसभा मतदारसंघात मतदान प्रक्रिया संपली असून सोमवारी सायंकाळी ६ वाजेपर्यंत अंदाजे सरासरी  ५४.३३ टक्के मतदान झाले.

राज्यात कुठे किती मतदान
voting

मुंबई, २१ मे, २०२४, प्रतिनिधी : राज्यातील लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या आणि‍ शेवटच्या टप्प्यातील १३ लोकसभा मतदारसंघात मतदान प्रक्रिया संपली असून सोमवारी सायंकाळी ६ वाजेपर्यंत अंदाजे सरासरी  ५४.३३ टक्के मतदान झाले असल्याची माहिती, मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयामार्फत देण्यात आली.
पाचव्या टप्प्यातील एकूण १३ लोकसभा मतदारसंघनिहाय मतदानाची टक्केवारी पुढीलप्रमाणे :
धुळे- ५६.६१ टक्के
दिंडोरी-  ६२.६६ टक्के
नाशिक –  ५७.१० टक्के
पालघर- ६१.६५ टक्के
भिवंडी-५६.४१ टक्के
कल्याण –  ४७.०८ टक्के
ठाणे –   ४९.८१  टक्के
मुंबई उत्तर – ५५.२१ टक्के
मुंबई उत्तर मध्य – ५१.४२ टक्के
मुंबई उत्तर पूर्व – ५३.७५ टक्के
मुंबई उत्तर पश्चिम – ५३.६७ टक्के
मुंबई दक्षिण – ४७.७० टक्के
मुंबई दक्षिण मध्य- ५१.८८ टक्के


सम्बन्धित सामग्री