Monday, February 10, 2025 11:39:13 AM

Mobile Forensic Van In Maharashtra
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते मोबाईल फॉरेन्सिक व्हॅनचे लोकार्पण

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते मोबाईल फॉरेन्सिक व्हॅनचे लोकार्पण झाले आहे. या व्हॅनचा डीएनए, नार्को टेस्ट आणि बलात्कार प्रकरणाचे घटनास्थळावरील नमुने घेण्यासाठी उपयोग होणार आहे.

 मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते मोबाईल फॉरेन्सिक व्हॅनचे लोकार्पण

मुंबई : आज मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत मोबाईल फॉरेन्सिक व्हॅन्सचं लोकार्पण करण्यात आलं. या व्हॅन्सच्या माध्यमातून राज्यात गुन्हेगारीला नवा शास्त्रीय दृष्टिकोन प्राप्त होईल. अनेक वेळा योग्य पुराव्याअभावी आरोपी सुटले आहेत, पण आता हे बदलणार आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्ट केलं की, मोबाईल फॉरेन्सिक व्हॅन्समुळे घटनास्थळीच 100 टक्के प्राथमिक आणि अंतिम निष्कर्ष काढता येतील, ज्यामुळे गुन्हेगारीच्या तपासात लक्षणीय बदल होईल.

काय म्हणाले मुख्यमंत्री फडणवीस ? 
मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले की, "महाराष्ट्र हे पहिलं राज्य आहे, जिथे मोबाईल फॉरेन्सिक व्हॅन्स तयार करण्यात आले आहेत. या व्हॅन्समध्ये वैज्ञानिक विश्लेषक आणि फॉरेन्सिक एक्स्पर्ट्स असतील, जे घटनास्थळीच पुरावे संकलित करतील आणि योग्य पद्धतीने त्यांचे परीक्षण करतील". आतापर्यंत महाराष्ट्रात 21 व्हॅन्स रोलआऊट झाल्या आहेत, आणि एकूण 256 व्हॅन्स तयार केली जातील. यामुळे महाराष्ट्रात अपराध सिद्धीचा दर वाढवता येईल आणि गुन्हेगारांमध्ये भय निर्माण होईल." "या व्हॅन्सच्या मदतीने, विशेषतः रेप आणि गंभीर गुन्ह्यांसाठी, पुराव्याचं संकलन सुलभ होईल. अशा प्रकारच्या व्हॅन्समुळे गुन्हेगारीच्या तपासात गुणात्मक बदल होईल आणि त्याचबरोबर दोषींना शिक्षा मिळवण्यातही मदत होईल."

व्हॅन्समध्ये काय असणार आहे?
या व्हॅन्समध्ये विविध प्रकारचं अत्याधुनिक साहित्य आणि उपकरणं असतील. त्यात ब्लड सॅम्पल, नार्कोटिक सॅम्पल आणि स्फोटक सॅम्पल्स यांसारख्या महत्त्वाच्या पुराव्यांचे संकलन केले जाऊ शकते. या किट्सद्वारे घटनास्थळीच प्राथमिक तपासणी केली जाऊ शकते, ज्यामुळे तपासाची गती वाढेल. हे सगळं करणं अत्यंत महत्त्वाचं आहे, कारण केवळ पुराव्याअभावी आरोपी सुटत असतात.

ब्लॉकचेन तंत्रज्ञानाचा वापर
मुख्यमंत्र्यांनी एक महत्त्वाचा मुद्दा उचलला आहे - पुराव्यांशी छेडछाड होणार नाही. "ब्लॉकचेन तंत्रज्ञानामुळे एकदा जो पुरावा संकलित केला जातो, तो नंतर बदलता येणार नाही. यामुळे पुराव्याचा संपूर्ण इतिहास सुरक्षित राहील," असं त्यांनी सांगितलं. ही पद्धत पुराव्यांची इंटेग्रिटी कायम ठेवण्यास मदत करेल.
या मोबाईल फॉरेन्सिक व्हॅन्समध्ये सीसीटीव्ही कॅमेरे आणि फ्रीज असणार आहेत, जेणेकरून पुराव्याचा योग्य तपास करता येईल आणि आवश्यक तापमान ठेवता येईल. यामुळे प्रत्येक पुरावा सुरक्षितपणे संकलित होईल आणि त्यात कोणताही बदल होऊ नये याची खात्री केली जाईल.

जय महाराष्ट्र न्यूजच्या थेट संपर्कात राहण्यासाठी व्हॉट्सअप चॅनेल वर क्लिक करा.

'>http://


सम्बन्धित सामग्री






Live TV