Saturday, April 26, 2025 12:38:25 AM

महाशिवरात्री उत्साहात! घृष्णेश्वर ज्योतिर्लिंगाच्या दर्शनासाठी भाविकांचा महापूर

महाशिवरात्रीच्या पावन पर्वावर वेरूळ येथील बारावे ज्योतिर्लिंग श्री घृष्णेश्वर मंदिर भाविकांच्या गर्दीने गजबजून गेले. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या शिवभक्तांनी भक्तिभावाने भगवान घृष्णेश्वराचे

महाशिवरात्री उत्साहात घृष्णेश्वर ज्योतिर्लिंगाच्या दर्शनासाठी भाविकांचा महापूर

छत्रपती संभाजीनगर: महाशिवरात्रीच्या पावन पर्वावर वेरूळ येथील बारावे ज्योतिर्लिंग श्री घृष्णेश्वर मंदिर भाविकांच्या गर्दीने गजबजून गेले. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या शिवभक्तांनी भक्तिभावाने भगवान घृष्णेश्वराचे दर्शन घेतले.

शिवभक्तांना गाभाऱ्यात प्रवेशाची परवानगी असल्याने पहाटेपासूनच दर्शनासाठी लांबच लांब रांगा लागल्या होत्या. ‘ओम नमः शिवाय, हर हर महादेव’च्या जयघोषाने मंदिर परिसर भक्तिमय झाला होता. महाआरतीच्या वेळी तर अलोट गर्दी उसळली होती.
 
देशातील 12 ज्योतिर्लिंगांपैकी शेवटचे घृष्णेश्वर ज्योतिर्लिंग असल्याने येथे बाराही महिने भाविकांची वर्दळ असते. मात्र, महाशिवरात्रीनिमित्त येथे लाखोंच्या संख्येने भक्तगण दर्शनासाठी येतात. यंदाही मध्यरात्रीपासूनच भक्त रांगा लावून दर्शनासाठी आतुर होते.

हेही वाचा : अंबादास दानवे यांनी घेतले महादेवाचे दर्शन, राज्याच्या समृद्धीसाठी प्रार्थना

भाविकांची गर्दी आणि सुरक्षेच्या पार्श्वभूमीवर मंदिर परिसरात कडेकोट पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. एक डीवायएसपी, एक पोलिस निरीक्षक, दहा सहायक पोलिस निरीक्षक, सहा अधिकारी, 51 होमगार्ड, एक दंगाकाबू पथक, तसेच बॉम्बशोधक आणि नाशक पथक तैनात आहे. मंदिर परिसरातील 32 सीसीटीव्ही कॅमेऱ्यांद्वारे सतत नजर ठेवली जात आहे.
 


सम्बन्धित सामग्री