मनसेची फेररचना; अमित ठाकरेंना मोठी जबाबदारी

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमध्ये फेररचना करण्यात आलीय. यामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी अमित ठाकरे यांना मोठी जबादारी दिल्याचं पाहायला मिळतंय.

मनसेची फेररचना; अमित ठाकरेंना मोठी जबाबदारी

महाराष्ट्र: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमध्ये फेररचना करण्यात आलीय. यामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी अमित ठाकरे यांना मोठी जबादारी दिल्याचं पाहायला मिळतंय. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी संघटनात्मक पातळीवर जोर देण्यास सुरुवात केली आहे. मनसेमधील नवीन संघटनात्मक बदल आणि रचना त्यांनी जाहीर केले आहेत.

हेही वाचा: 'लाडक्या बहिणींना 2100 रुपये देण्याचा निर्णय योग्य वेळी घेतला जाईल'

काय आहेत बदल? 
मनसेने पहिल्यांदाच मुंबईसाठी अध्यक्षपदाची नेमणूक केली आहे. त्याशिवाय, राज ठाकरे यांचे पुत्र, मनसे नेते अमित ठाकरे यांच्यावरही मोठी जबाबदारी सोपवण्यात आली आहे. नुकत्याच झालेल्या एका बैठकीत राज ठाकरे यांनी नेत्यांना प्रमुख शहराच्या जबाबदाऱ्या वाटून देणार असल्याचे सांगितलं होते. तसेच नाशिक, नवी मुंबई, ठाणे जिल्ह्याच्या धर्तीवर मुंबईसाठीही अध्यक्ष नियुक्त करण्यात येणार आहे. मुंबईतील विभाग अध्यक्षांच्या कामावर देखरेख ठेवून त्यांच्यात समन्वय राखण्याची जबाबदारी मुंबई अध्यक्षावर असणार आहे. 

याच बरोबर मनसेच्या मुंबईच्या अध्यक्षपदी संदीप देशपांडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. संदीप देशपांडे यांच्यानंतर 3 जिल्हा उपाध्यक्ष असणार आहेत. त्या उपाध्यक्षांनंतर विभाग अध्यक्ष असणार आहेत. मनसेने आतापर्यंत मुंबईसाठी कधीही अध्यक्षांची नेमणूक केली नव्हती. आता मात्र थेट पहिल्यांदाच मुंबई अध्यक्षाची नियुक्ती करण्यात आली आहे.

यामध्ये मनसेने आपल्या पक्ष संघटनेची सगळी रचना बदलली आहे. मनसेचे पहिले मुंबई अध्यक्षपद संदीप देशपांडे यांच्याकडे सोपवण्यात आले आहे. तर, केंद्रीय समितीमध्ये विभाग अध्यक्षांची जबाबदारी नितीन सरदेसाई यांच्याकडे आहे. शाखा अध्यक्षांची जबाबदारी ही अमित ठाकरे यांच्याकडे असणार आहे. गटाध्यक्ष केंद्रीय समितीची जबाबदारी ही बाळा नांदगावकर यांच्याकडे असणार आहे. 
 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number