Saturday, June 15, 2024 04:40:17 PM

Monsoon Session
विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन

महाराष्ट्राच्या विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन २७ जूनपासून सुरू होणार आहे. या अधिवेशनात राज्याचा पूर्ण अर्थसंकल्प सादर केला जाईल, असे कॅबिनेट मंत्री सुधीर मुनगंटीवार म्हणाले.

विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन

मुंबई : महाराष्ट्राच्या विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन २७ जूनपासून सुरू होणार आहे. या अधिवेशनात राज्याचा पूर्ण अर्थसंकल्प सादर केला जाईल, असे कॅबिनेट मंत्री सुधीर मुनगंटीवार म्हणाले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत हे निर्णय झाल्याची माहिती त्यांनी दिली. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मुंबई बाहेर असल्यामुळे व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे मंत्रिमंडळाच्या बैठकीला उपस्थित होते, असेही सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले. 

लोकसभेच्या निवडणुकीसाठी आचारसंहिता लागू होणार होती. यामुळे अर्थसंकल्पीय अधिवेशनात राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी लेखानुदान सादर केले. आता पावसाळी अधिवेशनात तेच राज्याचा पूर्ण अर्थसंकल्प सादर करणार असल्याची माहिती सुधीर मुनगंटीवार यांनी दिली.


सम्बन्धित सामग्री