महाराष्ट्र: महाराष्ट्रात अनेक राजकीय ऑफर बड्या नेत्यांना दिल्या जातात. त्यातच आता चर्चा आहे ती नाना पटोलेंनी दिलेल्या ऑफरची. नाना पाटोले यांनी थेट महाराष्ट्राचे दोन्ही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांना ऑफर दिलीय. नाना पटोलेंच्या या ऑफरने सर्वत्र चर्चेला उधाण आलंय. काय म्हणाले नाना पटोले पाहुयात:
शिंदे पकडणार होते काँग्रेसचा हात; बड्या नेत्याने केला दावा
काय म्हणाले नाना पटोले?
'अजितदादा अन् एकनाथ शिंदे यांची परिस्थिती खूप वाईट आहे. पक्ष टिकेल की नाही, याची भीती दोन्ही नेत्यांच्या मनात आहे. भाजप त्यांना जगू देत नाहीय. भाजपची ती सवयच आहे. देशात ज्यांच्यासोबत युती केली, त्यांना संपवण्याचं काम भाजपनं केलंय'.'तत्कानील मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी सुरू केलेल्या योजना भाजपनं बंद केल्या आहेत. त्यामुळे पवार आणि शिंदेंनी सावध राहावे.
आम्ही दोन्ही नेत्यांसोबत आहोत. अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांना आमच्याकडे बोलवणार आहोत. त्यांना आम्ही पाठिंबा देऊ. अजित पवार आणि एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रीपदाची आस लागलीय. भाजपच्या अधिपत्याखाली दोन्ही नेते मुख्यमंत्री होऊ शकत नाही. त्यामुळे अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांना आलटून -पालटून मुख्यमंत्री बनवून टाकू, आम्ही दोन्ही नेत्यांसोबत आहोत". असं नाना पटोले म्हणालेत.
दरम्यान या ऑफरवर ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिलीय. नाना पटोलेंनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवारांना दिलेल्या ऑफरवर संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिलीय, नाना पटोलेंनी दिलेली ऑफर ऐकून माझी वाचा गेली, मी यावर काय बोलू शकतो. नाना पटोले आमचे सहकारी आहेत. ते ज्येष्ठ नेते आहेत. राजकारणात काहीही अशक्य नसतं. राजकारणात सर्व शक्यता असतात. नाना पटोलेंनी ऑफर दिली असेल तर, आम्ही त्यांच्याशी चर्चा करू,असं संजय राऊत म्हणालेत.