Friday, April 25, 2025 10:01:36 PM

Nashik: ठाकरेंच्या खासदारांनी घेतली भाजपच्या पदाधिकाऱ्यांची भेट

नाशिकमध्ये राजकीय घडामोडींना वेग आल्याचं पाहायला मिळतंय. मागच्या निवडणुकांमध्ये नाशिकमध्ये तिकिटांवरून चांगलीच तारांबळ उडाल्याचं पाहायला मिळतंय.

nashik ठाकरेंच्या खासदारांनी घेतली भाजपच्या पदाधिकाऱ्यांची भेट

नाशिकमध्ये राजकीय घडामोडींना वेग आल्याचं पाहायला मिळतंय. मागच्या निवडणुकांमध्ये नाशिकमध्ये तिकिटांवरून चांगलीच तारांबळ उडाल्याचं पाहायला मिळतंय. त्यातच आता ठाकरे गटाचे नाशिकचे खासदार राजाभाऊ वाजे यांनी भाजप नेते आणि पदाधिकाऱ्यांची भेट घेतल्याने राजकीय वर्तुळात एकचं खळबळ उडालीय. आधीच कोकणात ठाकरे गटाला अनेक नेते रामराम करताय. त्यात आता नाशिकचे खासदार राजाभाऊ वाजे यांनी भाजप नेते आणि पदाधिकाऱ्यांची भेट घेतल्याने सर्वत्र चर्चेला उधाण आलंय. 

हेही वाचा: उन्हात जाऊन तुमचेही डोळे जळजळताय का? मग हे उपाय करा

याबाबत अधिक माहिती अशी की, ठाकरे गटाचे नाशिकमधील खासदार राजाभाऊ वाजे भाजप आमदार आणि पदाधिकाऱ्यांच्या घरी गेले. खासदार राजाभाऊ वाजे यांनी भाजप आमदार देवयानी फरांदे आणि सीमा हिरे यांच्या घरी जाऊन त्यांची सदिच्छा भेट घेतली. यावेळी आमदार देवयांनी फरांदे यांनी त्यांचा भगवी शाल आणि स्मृतीचिन्ह देऊन सत्कार केला. त्यानंतर दोघ नेत्यांमध्ये चर्चा झाली. भाजप आमदारांच्या भेटीनंतर राजाभाऊ वाजे हे भाजपच्या नाशिकमधील वसंत स्मृती कार्यालयात पोहचले. त्यांनी त्या ठिकाणी भाजप शहराध्यक्ष आणि जिल्हाध्यक्षांची भेट घेतली.

राजभाऊ वाझे यांच्या भाजप नेते आणि पदाधिकाऱ्यांच्या या भेटीचे कारण शहर विकासाचे असल्याचे सांगितले जात आहे. मात्र खासदारांचा या भेटीने राजकीय वर्तुळात वेगळीच चर्चा सुरु झाली आहे. राजाभाऊ वाझे यांनी लोकसभा निवडणुकीत शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार हेमंत गोडसे यांचा पराभव केला होता. हेमंत गोडसे त्यावेळी विद्यामान खासदार होते. त्यात आता ठाकरे गटाचे नाशिकचे खासदार राजाभाऊ वाजे यांनी भाजप नेते आणि पदाधिकाऱ्यांची भेट घेतल्याने राजकीय वर्तुळात एकचं खळबळ उडाली असून सर्वत्र चर्चेला उधाण आलंय. 


सम्बन्धित सामग्री