Monday, February 10, 2025 05:47:02 PM

Jalgaon
निमगावकरांनी काढली वानराची अंत्ययात्रा; वाचून व्हाल आश्चर्यचकित

निमगावात वानराने हनुमानाच्या चरणी प्राण सोडले आणि गावकऱ्यांनी त्या वानराची अंत्ययात्रा काढली.

निमगावकरांनी काढली वानराची अंत्ययात्रा वाचून व्हाल आश्चर्यचकित

जळगाव : अंजनीच्या सूता तुला रामाचं वरदान, एकमुखानं बोला, बोला जय जय हनुमानं.. हनुमंताचं प्रतिरुप म्हणून समाजात वानरांना स्थान आहे. जन्म आणि मृत्यूच्या चक्रातून सुटणं म्हणजे मुक्ती आणि ही मुक्ती भगवंताच्या चरणीच लाभते हे आपले संस्कार. त्यामुळे मंदिरात, यात्रेत, उत्सवात मृत्यू येणाऱ्या सजीवाला सद्गती प्राप्त होते अशी श्रद्धा आहे. त्याचं प्रत्यंतर आलं आहे. जळगाव जिल्ह्यातील अमळनेरमधल्या निम गावात एक घटना घडली आहे. 
हेही वाचा : सिद्धिविनायक मंदिरात दर्शनासाठी जात आहात तर सावधान...

निम गावातल्या हुकूमचंद पाटील यांच्या धाब्यावरून एक वयस्कर वानर खाली पडलं. वेदनेनं विव्हळणाऱ्या त्या वानराला स्थानिकांनी उपचारासाठी डॉक्टरांकडे नेलं. उपचारानंतर गावकऱ्यांनी त्याला गावातल्या मंदिराजवळ आणलं. ते मंदिर होतं हनुमंताचं. मारुतीरायाचं दर्शनं होताच त्या वानरानं हनुमंताच्या पायाशी उडी घेतली, देवाच्या चरणावर डोकं ठेवत ते तिथेच निपचीत पडलं. त्या वानराला काय झालं म्हणून पाहायला गेलेल्या गावकऱ्यांच्या लक्षात आलं की, त्या वानरानं तेथेच आपले प्राण सोडले आहेत. 

जय महाराष्ट्र न्यूजच्या थेट संपर्कात राहण्यासाठी  व्हॉट्सअप चॅनेल वर क्लिक करा.
 

या घटनेनं गावकरी निस्तब्ध झाले. अशी घटना गावात पहिल्यांदाच घडली होती. डोळ्यादेखत एका वानरानं आपले प्राण भगवंताचरणी अर्पण केले. गावकऱ्यांनी निर्णय घेतला या वानराची माणसाप्रमाणे अंत्ययात्रा काढायची. जमवाजमव झाली आणि जशी एखाद्या प्रसिद्ध व्यक्तिची अंत्ययात्रा निघते तशीच अंत्ययांत्रा या वानराची निघाली. काही गावकऱ्यांनी केस देण्याची प्रथाही पूर्ण केली. गावातल्या भावूक झालेल्या माताभगिनीही वानराच्या अंत्ययात्रेत सहभागी झाल्या.

हेही वाचा : मुख्यमंत्री फडणवीस आणि केंद्रीय मंत्री गडकरींच्या हस्ते नागपूरातील आरयूबीचे लोकार्पण

ना ओळखीचं ना पाळखीचं.. ना कोणाच्या परिचयातलं.. शुद्ध हेतूनं, शुद्ध भावनेनं या सजीवाला निम गावकऱ्यांनी परमेश्वर स्वरुप मानलं. आता अजून एक गोष्ट होणार आहे आणि ती म्हणजे या वानराचं उत्तरकार्य करून त्याची मूर्ती उभारण्यात येणार आहे. मानला तर देव नाहीतर दगड अशी स्थिती असणाऱ्या आपल्या या समाजात निम गावकऱ्यांनी सजीवत्वाचा एक नवा पायंडा घातला आहे. 


सम्बन्धित सामग्री