पतीवर गोळ्या झाडताच पत्नी म्हणाली, आम्हालाही मारा; पहलगामच्या डोंगरात घडलेला थरार समोर

अनंतनाग जिल्ह्यातील बैसरन खोऱ्याजवळील टेकड्यांवर फिरण्यासाठी गेलेल्या पर्यटकांवर दहशतवाद्यांनी अचानक गोळीबार केला. या भीषण हल्ल्यात 27 पर्यटकांचा मृत्यू झाला.

पतीवर गोळ्या झाडताच पत्नी म्हणाली, आम्हालाही मारा; पहलगामच्या डोंगरात घडलेला थरार समोर

जम्मू-काश्मीरमधील सुंदरतेने नटलेले पहलगाम आता एका भयावह घटनेमुळे चर्चेत आले आहे. अनंतनाग जिल्ह्यातील बैसरन खोऱ्याजवळील टेकड्यांवर फिरण्यासाठी गेलेल्या पर्यटकांवर दहशतवाद्यांनी अचानक गोळीबार केला. या भीषण हल्ल्यात 27 पर्यटकांचा मृत्यू झाला असून, अनेकजण गंभीर जखमी आहेत. हल्ल्यानंतर संपूर्ण भागात भीतीचे सावट पसरले आहे. 

हल्ल्यात कर्नाटकच्या शिवमोग्गा येथील मंजूनाथ यांचा जागीच मृत्यू झाला. त्यांच्या पत्नी पल्लवी आणि मुलगा त्यांच्या सोबत होते. डोंगराच्या रम्य निसर्गात फिरायला गेलेलं हे कुटुंब क्षणात उध्वस्त झालं. मंजूनाथ यांना दहशतवाद्यांनी निवडकपणे लक्ष्य करत गोळ्या घातल्या. त्या क्षणी पल्लवीने दाखवलेली धैर्याची भावना सर्वांचं काळीज हलवून टाकणारी ठरली.

हेही वाचा: पहलगाम दहशतवादी हल्ल्यात डोंबिवलीतील 3 पर्यटकांचा मृत्यू, महाराष्ट्रातील 6 जणांनी गमावला जीव

आता आम्हालाही मारा, पल्लवींचा थरारक अनुभव
'तुम्ही माझ्या नवऱ्याला मारलात, आता आम्हालाही मारा,' असं पल्लवी यांनी दहशतवाद्यांना स्पष्टपणे सांगितलं. मात्र एक दहशतवादी म्हणाला, 'मी तुम्हाला मारणार नाही, जा आणि मोदींना सांग.' या घटनेनंतर तीन स्थानिकांनी धाडसाने पुढे येत पल्लवी आणि त्यांच्या मुलाचा जीव वाचवला.

हेही वाचा: पंतप्रधान मोदींनी सौदी दौरा अर्धवट सोडून देशात घेतली परतफेर, पहलगाम हल्ल्याची केली पाहणी

या हल्ल्याच्या आदल्या दिवशी मंजूनाथ आणि पल्लवी यांनी शिकारा राईडचा आनंद घेतला होता. त्या व्हिडीओमध्ये ते काश्मीरच्या सौंदर्याचं कौतुक करताना दिसतात. बोट हाऊसमधील अनुभवही त्यांनी खास सांगितला होता. पण दुसऱ्याच दिवशी घडलेल्या या दहशतीने त्यांच्या आनंदाच्या क्षणांना काळानं गिळंकृत केलं. तो व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे आणि लोकांच्या मनात हळहळ आणि संताप निर्माण करत आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number