पुणे, १४ मे २०२४, प्रतिनिधी : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील विविध विभांगांचे २०२४-२५ साठीचे शैक्षणिक वर्ष जाहीर झाले आहे. त्यानुसार, १ जुलैपासून शैक्षणिक वर्षाला सुरुवात होणार असून, पुढील वर्षी १९ मे रोजी शैक्षणिक वर्षाची सांगता होणार आहे.
विद्यापीठाच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान, मानव्य, वाणिज्य आणि व्यवस्थापन,आंतरविद्याशाखीय अभ्यास या विद्याशाखांतर्गत असलेल्या विभागातील विविध पदवी, पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमांसाठी शैक्षणिक वर्ष जाहीर झाले आहे. त्यानुसार, विद्यापीठाचे पहिले सत्र १ जुलै ते १४ डिसेंबरदरम्यान तर दुसरे सत्र १ जानेवारी ते १९ मे या कालावधीत होईल, अशी माहिती विद्यापीठाकडून मिळत आहे.
शैक्षणिक वर्ष २०२४ -२५ कसे असेल ?
पहिले सत्र : १ जुलै २०२४ ते १४ डिसेंबर २०२४
दुसरे सत्र : १ जानेवारी २०२५ ते १९ मे २०२५
हिवाळी सुटी : १६ ते ३१ डिसेंबर २०२४
उन्हाळी सुटी : २१ मे ते ३० जून २०२५