Monday, February 10, 2025 12:25:22 PM

PUNE RAHUL SOLAPURKAR VS MARATHA
राहुल सोलापूरकर याच्या वक्तव्यावरून पुण्यात मराठा समाजाचे आंदोलन

शिवाजी महाराजांबद्दलच्या विधानावर मराठा कार्यकर्त्यांचा आक्रमक विरोधshivaji-maharaj, maratha-protest, rahul-solapurkar, pune-news, history-debate, shiv-premi, agra-escape, maharashtra-politics, marat

राहुल सोलापूरकर याच्या वक्तव्यावरून पुण्यात मराठा समाजाचे आंदोलन

'राहुल सोलापूरकर यांनी माफी मागावी' इतिहासकार इंद्रजीत सावंत यांची मागणी

पुणे : पुण्यात मराठा कार्यकर्त्यांनी अभिनेते राहुल सोलापूरकर यांच्या घरासमोर तीव्र आंदोलन केले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या आग्र्याहून सुटकेबाबत केलेल्या वादग्रस्त विधानामुळे शिवप्रेमी संतप्त झाले असून, पोलिसांकडे निवेदन देत योग्य ती कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे. यामुळे राहुल सोलापूरकर यांच्या घराबाहेर मोठा पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

रात्री उशिरापर्यंत पोलिस बंदोबस्त तैनात ठेवण्यात आला असून, दंगल नियंत्रण पथकासह चार ते पाच वाहने त्यांच्या निवासस्थानाबाहेर दाखल झाली आहेत. शेकडो पोलीस कर्मचारी परिस्थितीवर नजर ठेवून आहेत.

राहुल सोलापूरकर यांचे वक्तव्य व त्यावर प्रतिक्रिया
अभिनेते राहुल सोलापूरकर यांनी एका मुलाखतीत म्हटले होते की, "छत्रपती शिवाजी महाराजांनी आग्र्याहून सुटकेसाठी मिठाईच्या पेटाऱ्यांचा वापर केला नव्हता, तर त्यांनी औरंगजेबाच्या सरदारांना लाच देऊन सुटका करून घेतली."

त्यांच्या या विधानावर इतिहासकार इंद्रजीत सावंत यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. त्यांनी स्पष्ट केले की, "या विधानाला कोणताही ऐतिहासिक आधार नाही. महाराजांची सुटका जगाच्या इतिहासात एक महान पराक्रम मानला जातो. समकालीन कागदपत्रांमध्ये लाच दिल्याचा उल्लेख नाही. उलट, महाराज सुटून गेल्यानंतर औरंगजेबाने त्यांना पकडण्यासाठी कठोर आदेश दिले होते."

शिवप्रेमींचा आक्रमक पवित्रा
या विधानामुळे महाराष्ट्रभर संतापाची लाट उसळली असून, पुण्यात मराठा कार्यकर्त्यांनी थेट राहुल सोलापूरकर यांच्या घरासमोर आंदोलन केले. त्यांनी पोलिसांकडे निवेदन देऊन संबंधित वक्तव्याबाबत कठोर कारवाईची मागणी केली आहे.

राहुल सोलापूरकर यांनी दिलगिरी व्यक्त केली, पण संतप्त प्रतिक्रिया कायम
विवाद वाढल्यानंतर राहुल सोलापूरकर यांनी दिलगिरी व्यक्त केली असली तरी शिवप्रेमी संतप्त आहेत. त्यांनी सरकारकडेही याची गांभीर्याने दखल घेण्याची मागणी केली आहे.


सम्बन्धित सामग्री