Monday, February 10, 2025 07:24:45 PM

RAJAN SALAVI BJP JOIN
राजन साळवी अखेर भाजपमध्ये जाणार? येत्या दोन ते तीन दिवसांत होणार प्रवेश!

विधानसभेतील पराभवानंतर नाराज राजन साळवी अखेर भाजपमध्ये? लवकरच अधिकृत घोषणा!उद्धव ठाकरे सेनेला कोकणातून मोठा धक्का! राजन साळवी भाजपमध्ये दाखल होणार?

राजन साळवी अखेर भाजपमध्ये जाणार येत्या दोन ते तीन दिवसांत होणार प्रवेश

राजन साळवी भाजपमध्ये जाणार? मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत प्रवेशाची शक्यता!

रत्नागिरी : शिवसेना उद्धव ठाकरे सेनेचे उपनेते आणि माजी आमदार राजन साळवी अखेर भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा जोर धरू लागली आहे. विश्वसनीय सूत्रांच्या माहितीनुसार, येत्या दोन ते तीन दिवसांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत मुंबईत हा प्रवेश होण्याची शक्यता आहे.

गेल्या काही महिन्यांपासून राजन साळवी यांच्या भाजप प्रवेशाबाबत चर्चा सुरू होत्या. विधानसभेतील पराभवानंतर त्यांनी पक्षातील वरिष्ठ नेत्यांवर पराभवाचे खापर फोडले होते. तसेच, पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचीही त्यांनी भेट घेतली होती. मात्र, त्यानंतरही त्यांच्या नाराजीचे कारण स्पष्ट झाले नव्हते.

👉👉 हे देखील वाचा : "भाजपालाही वाटतं की मी त्यांच्यासोबत असावं" - भुजबळ

फडणवीस यांच्या भेटीनंतर प्रवेश निश्चित?
विश्वसनीय सूत्रांच्या माहितीनुसार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्यानंतर राजन साळवी यांनी भाजपमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतल्याचे सांगितले जात आहे. याबाबत अधिकृत घोषणा झालेली नसली तरी त्यांच्या भाजप प्रवेशाबाबतचा मुहूर्त जवळ आल्याचे दिसत आहे.

उद्धव ठाकरे सेनेला कोकणातून मोठा धक्का
राजन साळवी हे कोकणातील प्रभावी नेते मानले जातात. त्यामुळे त्यांच्या पक्षत्यागामुळे ठाकरे सेनेला कोकणात मोठा फटका बसणार आहे. काही महिन्यांपूर्वीच उद्धव सेनेच्या काही नेत्यांनी शिंदे गटात प्रवेश केला होता. त्यात आता राजन साळवी भाजपमध्ये गेल्यास ठाकरे सेनेच्या संघटनात्मक बळावर परिणाम होऊ शकतो.

👉👉 जय महाराष्ट्र न्यूजच्या थेट संपर्कात राहण्यासाठी व्हॉट्सअप चॅनेल वर क्लिक करा.

गेल्या काही दिवसांपासून राजन साळवी यांच्या राजकीय वाटचालीकडे सर्वांचे लक्ष लागले होते. आता त्यांच्या निर्णयामुळे कोकणातील राजकारण ढवळून निघण्याची शक्यता आहे. येत्या काही तासांत यावर अधिकृत घोषणा होण्याची शक्यता असल्याने त्यांच्या पुढील पावलांकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.


सम्बन्धित सामग्री