सोन्याच्या दरात पुन्हा एकदा मोठी उसळी पाहायला मिळत आहे. गेल्या सात दिवसांत सोन्याच्या किंमतीत तब्बल 7,000 रुपयांची वाढ झाली असून, यामुळे 10 ग्रॅम सोन्याचा दर 87,0000 रुपयांवर पोहोचला आहे.
सोन्याच्या किमतीतील ही सततची वाढ गुंतवणूकदार आणि ग्राहकांसाठी महत्त्वाची ठरत आहे. जागतिक अर्थव्यवस्था, चलनवाढ, आणि आंतरराष्ट्रीय बाजारातील अस्थिरता यामुळे सोन्याच्या दरात वाढ होत असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. याशिवाय, डॉलरच्या तुलनेत रुपयाच्या कमजोरीचा प्रभावही सोन्याच्या किमतीवर दिसत आहे.
90,000 चा टप्पा लवकरच?
विशेषत: लग्नसराईचा हंगाम तोंडावर असताना सोन्याच्या किमतीतील ही वाढ सर्वसामान्य खरेदीदारांसाठी मोठा धक्का आहे. तज्ज्ञांच्या अंदाजानुसार, येत्या काही दिवसांत सोन्याचा दर 90,000 रुपयांपर्यंत जाऊ शकतो. त्यामुळे सोनं खरेदी करण्याचा विचार करत असलेल्या ग्राहकांनी अधिक वाढ होण्याआधीच निर्णय घेणे फायदेशीर ठरू शकते.
वाढलेल्या दरामुळे सोनं व्यापारी त्रस्त, 'सोनं खरेदीला ग्राहक येईनात' 'सरकारनं सोन्याचे भाव कमी करण्यासाठी पाऊलं उचलावी'
सोने व्यापाऱ्यांची सरकारकडे मागणी