कोल्हापूर : आज शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेतली आणि त्यात विविध राजकीय मुद्द्यांवर मत व्यक्त केले. यावेळी त्यांनी त्यांच्या तब्येतीविषयी बोलताना सांगितले की, "माझी तब्येत ठीक नाही, त्यामुळे आगामी प्रेस परिषद सुप्रियाताई घेत असतील," असे सांगितले.
शरद पवार यांनी उद्धव ठाकरे यांच्या हिंदुत्वाविषयी केलेल्या वक्तव्यावर प्रत्युत्तर दिले. उद्धव ठाकरे यांनी काल भाजपच्या हिंदुत्वावर आपली भूमिका स्पष्ट केली होती. पवार म्हणाले, "उद्धव ठाकरे सतत भाजपच्या हिंदुत्वावर टीका करत असतात आणि काल देखील त्यांनी तेच सांगितलं." तसेच, त्यांनी काल झालेल्या दोन कार्यक्रमांवरही भाष्य केले. पवार म्हणाले, "उद्धव ठाकरेंच्या सभेला अधिक गर्दी पाहायला मिळाली आणि लोकांच्या उपस्थितीवरून तो एक संकेत आहे."
👉👉 हे देखील वाचा : आम्ही अपयशातही नैतिकता सोडली नाही
बाळासाहेब ठाकरे यांच्या वंशावर असलेल्या अधिकारावर पवारांनी व्यक्त केलेली भावना देखील महत्त्वाची ठरली. पवार म्हणाले, "दोघांनाही बाळासाहेब ठाकरे यांच्यावर अधिकार आहे असं वाटतं, पण सत्यता ही आहे की लोकांच्या उपस्थितीवरून उद्धव ठाकरेंच्या सभेला अधिक गर्दी होती." पवार यावेळी उद्धव ठाकरेंच्या स्वबळाबाबतच्या भूमिकेवर देखील बोलले. "उद्धव ठाकरे स्वबळाबाबत बोलले, पण त्या बाबतीत खूप टोकाची भूमिका घेतली जाईल असं मला वाटत नाही," असे ते म्हणाले.
शरद पवारांनी अमित शाह यांच्या वक्तव्यावर देखील टीका केली. पवार म्हणाले, "अमित शाह यांचा बोलण्याचा टोन अति टोकाचा आहे. देशाच्या गृहमंत्र्यांकडून अशी अपेक्षा नाही की ते अतिरेकी बोलावे. अमित शाह यांच्यावर कोल्हापूरच्या संस्कारांचा काहीच प्रभाव दिसत नाही." पवारांनी या मुद्द्यावर गंभीर चिंता व्यक्त केली.
एकनाथ शिंदे आणि अमित शाह यांच्या संबंधावर बोलताना पवार म्हणाले, "एकनाथ शिंदे अमित शाह यांच्यासोबत असणार आहेत. ते एका पक्षाचे प्रमुख आहेत, त्यामुळे त्यांना आपला पक्ष वाढवण्याचा अधिकार आहे." याशिवाय, पवार यांनी उद्योग मंत्री उदय सामंत यांच्या दावोस भेटीवरही टिप्पणी केली. "उदय सामंत दावोस मध्ये बसून करार करत असताना, त्यांची वक्तव्य मुख्यमंत्र्यांच्या उद्देशाशी सुसंगत नाही," असे पवार म्हणाले.
राज्य सरकारच्या दावोस दौऱ्याबद्दल शरद पवारांनी सांगितले, "काल जे करार झाले, त्यापैकी अनेक करार तीन वर्षांपूर्वीच झाले होते. त्या काळात जिंदाल कंपनीने करार केला होता. दावोस मध्ये ते परत करून आणणे, हे फक्त एक दिखावा आहे." पवार यांनी यावरून सरकारच्या धोरणावर अप्रत्यक्षपणे टीका केली.
शरद पवारांनी अजित पवार यांच्याशी बंद दरवाजाआड चर्चा झाल्याचे सांगितले. "अजित पवार यांच्याशी बंद दरवाजात साखर कारखान्याबाबत चर्चा झाली, मात्र राष्ट्रवादी पक्षाच्या भविष्यातील दृष्टीकोनावर काही चर्चा झाली नाही," असे पवार म्हणाले.
तसेच, मणिपूर मुद्द्याबद्दल पवार यांनी स्पष्टपणे सांगितले, "मणिपूरमुळे देशात काही बदल होईल असे मला अजिबात वाटत नाही. या मुद्द्यावर राजकीय उलथापालथ होईल असे मला दिसत नाही."
👉👉 जय महाराष्ट्र न्यूजच्या थेट संपर्कात राहण्यासाठी व्हॉट्सअप चॅनेल वर क्लिक करा.