देहू: प्रसिद्ध शिव व्याख्याते तसेच जगद्गुरू संत तुकाराम महाराजांचे 11 वे वंशज हभप शिरीष महाराज मोरे यांनी आत्महत्या केली आणि सर्वत्र एकच खळबळ उडाली. हभप शिरीष महाराज मोरे यांनी देहू येथील आपल्या राहत्या घरी आत्महत्या करून आपले जीवन संपवले. कर्जाच्या ओझ्याखाली त्यांनी हे टोकाचं पाऊल उचललं असल्याचं समोर आलं. धक्कादायक म्हणजे आत्महत्येपूर्वी हभप शिरीष महाराज मोरे यांनी चार चिठ्या लिहल्या असल्याचं देखील समोर आलंय. दरम्यान कर्जापायी त्यांनी हे टोकाचं पाऊल उचललं असल्याचं समोर आलं असून संपूर्ण देहूवर दुःखाचा मोठा डोंगर कोसळला.
हेही वाचा: इंडियाज गॉट लेटेंट शोच्या आयोजकांविरोधात तक्रार
परंतु आता शिरीष महाराजांची शेवटची इच्छा पूर्ण झाली असून त्यांचं कर्ज फिटलं असल्याचं समोर आलंय. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे मोरे कुटुंबियांच्या मदतीला धावून आले असून मोरे यांच्यावर असलेले 32 लाखांचे कर्ज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी फेडलं आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा 9 फेब्रुवारी राजी वाढदिवस होता. शिंदे यांनी वाढदिवसाचे औचित्य साधत मोरे कुटुंबाला मदत करण्याचा निर्णय घेतला. आणि मोरे कुटुंबाच्या डोक्यावरील कर्जाचा डोंगर उतरवला.
दरम्यान शिरीष महाराज मोरे यांनी आत्महत्येपूर्वी चार चिठ्या लिहून ठेवल्या होत्या त्यात माझा कुटुंबाला कर्ज फेडण्यास मदत करा असे आवाहन देखील केले होते. त्यातच आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेनी त्यांचे 32 लाखांचे कर्ज फेडले आहे. आमदार विजय शिवतारेंनी महाराजांच्या कुटुंबियांचे सांत्वन करताना शिंदेंनी पाठवलेली 32 लाखांची रक्कम देऊ केली. पाच फेब्रुवारीला देहूतील राहत्या घरी शिरीष महाराजांनी गळफास घेत आत्महत्या केली अन् वारकरी संप्रदयात शोककळा पसरली. ही बातमी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना समजली अन् त्यांनी ही याबाबत दुःख व्यक्त केलं. ज्या कारणाने महाराजांनी आत्महत्या केली, ते कर्जाचं ओझं स्वतः उपमुख्यमंत्री शिंदेंनी उतरवलं.