नवी मुंबई: नवी मुंबईतून एक धक्कादायक बातमी समोर आलीय. या घटनेने संपूर्ण नवी मुंबई शहरात हळहळ व्यक्त केली जातेय. नवी मुंबईमधील पोतदार शाळेत एका विद्यार्थ्याने आत्महत्या केलीय. धक्कादायक म्हणजे नववीत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांने शाळेत हे टोकाचं पाऊल का उचललं असा प्रश्न सर्वानाच पडलाय. शाळेच्या इमारतीच्या पाचव्या मजल्यावरून उडी मारून या विद्यार्थ्याने आत्महत्या केलीय.
आत्महत्येपूर्वी शिरीष महाराजांनी चिठ्ठीमध्ये लिहलं काय?
शाळेत सोडल्यानंतर तासाभरात वडिलांना फोन :
सकाळी वडिलांनी मुलाला शाळेत सोडले ,एका तासाने मुलगा गेल्याच फोन शाळेकडून आला
पोलिसांनी घटनेचा तपास केला सुरू
नीलकृष्णा निलेश किन्हीकर असं मुलाचे नाव आहे
जय महाराष्ट्र न्यूजच्या थेट संपर्कात राहण्यासाठी व्हॉट्सअप चॅनेल वर क्लिक करा.
दरम्यान नीलकृष्णा निलेश किन्हीकर असं या आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्यांचं नाव असून नवी मुंबईमधील पोतदार शाळेतील ही घटना आहे. या घटनेमुळे शालेय विद्यार्थ्यांमध्ये भीतीचे वातावरण असून किन्हीकर कुटुंबावर दुःखच मोठा डोंगर कोसळलाय.