Nashik Satpir Dargah : नाशिकच्या दर्ग्याविरोधातील कारवाईला सुप्रीम कोर्टाची स्थगिती

नाशिक जिल्ह्यातील काठेगल्ली येथील सातपीर दर्गा विरोधी कारवाईला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे. दर्गा ट्रस्टकडून पालिकेच्या नोटीशीला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले.

Nashik Satpir Dargah : नाशिकच्या दर्ग्याविरोधातील कारवाईला सुप्रीम कोर्टाची स्थगिती

नाशिक : नाशिक जिल्ह्यातील काठेगल्ली येथील सातपीर दर्गा विरोधी कारवाईला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे. दर्गा ट्रस्टकडून पालिकेच्या नोटीशीला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले. या प्रकरणी 21 एप्रिलला पुढील सुनावणी होणार आहे. यावर आता महापालिका काय भूमिका घेणार याकडे लक्ष लागले आहे. 

नाशिकच्या काठेगल्ली येथील सातपीर दर्गा प्रकरणी महापालिकेकडून कारवाई करण्यात आली. मात्र या कारवाईला सर्वोच्च न्यायालयाकडून स्थगिती देण्यात आली आहे. दर्गा ट्र्स्टकडून पालिकेच्या नोटीशीला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले. मनपाच्या नोटीस विरोधात उच्च न्यायालयाने याचिका दाखल करून घेतली नसल्याचा युक्तिवाद दर्गा ट्रस्टकडून सुप्रिम कोर्टात  करण्यात आला. त्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने पालिकेच्या कारवाईला स्थगिती दिली आहे. 

हेही वाचा : Laxman Hake: धनंजय मुंडेंना जाणीवपूर्वक टार्गेट केलं; ओबीसी नेत्याची टीका

महापालिकेच्या कारवाईला सर्वोच्च न्यायालयाची स्थगिती 
नाशिक महानगरपालिकेने अतिक्रमण हटवा मोहिमेंतर्गत सातपीर दर्ग्यावर कारवाई केली. मात्र सर्वोच्च न्यायालयाने कारवाईला स्थिगिती दिली असून महापालिकेच्या नोटीसबाबत खुलासा मागवला आहे. महापालिकेने 1 एप्रिल रोजी दर्गा अनधिकृत असल्याचे ठरवत उच्च न्यायालयाचा आधार घेत 15 दिवसात   दर्गा ट्रस्टने स्वत:हून दर्गा हटवला नाही तर महापिलकेकडून कारवाई करण्यात येईल अशी नोटीस बजावण्यात आली होती. या नोटीशीला दर्गा ट्रस्टकडून उच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले होते. मात्र उच्च न्यायालयाने यावर तातडीने सुनावणी केली नाही असे सांगत ट्रस्टने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. बुधवारी झालेल्या सुनावणीत सर्वोच्च न्यायालयाने तातडीने सुनावणी का केली नाही असा प्रश्न उच्च न्यायालयाला केला आहे. तसेच महापालिकेच्या कारवाईवर स्थिगिती दिली असून उच्च न्यायालयाने याबाबत खुलासा सादर करावा अशा सुचनाही सर्वोच्च न्यायालयाने दिल्या आहेत. 

नाशिक हिंसाचार प्रकरणी 1400 ते 1500 जणांवर गुन्हा दाखल
नाशिक दर्गा कारवाई दरम्यान पोलिसांवर हल्ला करण्यात आला आहे. या प्रकरणी 1400 ते 1500 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच 25 जणांना नाशिक पोलिसांकडून अटक करण्यात आले आहे. आरोपींमध्ये एका विधी संघर्षित बालकाचाही समावेश आहे. नाशिक हिंसाचार प्रकरणात राजकीय पक्षाचे पदाधिकारी देखील असल्याची माहिती आहे. तसेच हिंसाचार प्रकरणी पोलिसांकडून कठोर कारवाईला सुरुवात झाली आहे. 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number