Friday, April 25, 2025 09:51:49 PM

नागपूरच्या राड्या मागचा मास्टरमाईंड अखेर सापडला..

महाराष्ट्रात सद्या औरंगजेबाच्या कबरीच्या विषय चांगलाच तापला आहे. दोन दिवसांपूर्वी नागपूरच्या महाल परिसरामध्ये दंगल पेटल्याचं देखील पाहायला मिळालं होत.

नागपूरच्या राड्या मागचा मास्टरमाईंड अखेर सापडला

नागपूर: महाराष्ट्रात सद्या औरंगजेबाच्या कबरीच्या विषय चांगलाच तापला आहे. दोन दिवसांपूर्वी नागपूरच्या महाल परिसरामध्ये दंगल पेटल्याचं देखील पाहायला मिळालं होत. नागपूरच्या राड्यामुळे सर्वत्र तणाव निर्माण झाला होता. त्यानंतर नागपूरमध्ये तणावपूर्व शांतात पाहायला मिळाली. त्यानंतर आता नागपूर राड्यामागचा मास्टरमाईंड समोर आलाय. फहीम शमीम खान असे या मास्टरमाईंचे नाव असल्याचं समोर आलंय. नागपूर हिंसाचार प्रकरणी गणेशपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर आता पोलिसांनी धडक कारवाई करून या मास्टरमाईंडला अटक केलीय. 

हेही वाचा: Santosh Deshmukh Case: संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा खटला कुठे चालणार?

कोण आहे फहीम शमीम खान? 
फहीम खान नमाक व्यक्तीने परिसरात जमाव जमावल्याचा उल्लेख या एफआयआरमध्ये करण्यात आला आहे. फहीम खान हा मायनॉरिटी डेमोक्रॅटिक पक्षाचा शहर अध्यक्ष आहे. 

बजरंग दल, विश्व हिंदू परिषदेच्या निदर्शनानंतर पोलीस स्टेशनला निवेदन देण्यासाठी फहीम खान हा 50-60 जणांसोबत गेला होता, असेही एफआयआरमध्ये नमूद करण्यात आले आहे. फहीम खान याने 2024 नागपूर लोकसभा निवडणूक लढवली होती. त्यावेळी त्याची अमानत रक्कमही जप्त झाली. पोलिसांनी गुन्हा दाखल केलेल्या 51 लोकांमध्ये फईम खान याचाही समावेश आहे. फहीम खानच्या चिथावणीने जमाव हिंसक झाला असल्याचा आरोप आहे. त्यामुळे फहीम खान हाच मास्टरमाईंड आहे का, याची चौकशी सुरू करण्यात आली आहे.

           

सम्बन्धित सामग्री