बीड : बीडमधील अंबाजोगाईतील मारहाणीचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. दारू पिण्यासाठी पैसे न दिल्याने मारहाण केली होती. या प्रकरणातील आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले होते.
बीड जिल्ह्यातील अंबाजोगाईमधील दस्तगीरवाडी येथे एका मुलाला झालेल्या मारहाण प्रकरणी तीन जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. दारू पिण्यासाठी पैसे दिले नाहीत. म्हणून अंबाजोगाई तालुक्यातील दस्तगीरवाडी येथे कृष्णा साळे या तरूणाला तिघांनी मारहाण केली होती. या मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर अंबाजोगाई शहर पोलीस ठाण्यात तीन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणातील दोन आरोपी अल्पवयीन आहेत. कृष्णाला घाटात एकटे गाठून दारू पिण्यासाठी पैशांची मागणी केली. पैसे न दिल्याने कृष्णाला मारहाण झाली. या प्रकरणातील आरोपी अटकेत असून प्रकरणाची पुढील चौकशी पोलीस करत आहेत. बीडमध्ये दोन दिवसांपूर्वी एका तरूणाला मारहाण करण्यात आली. मात्र त्याचा दखल घेतली गेली नाही. त्यानंतर मारहाणीचा व्हिडिओ समाज माध्यमांमध्ये व्हायरल झाला होता. त्यानंतर बीड पोलिसांनी या प्रकरणाची दखल घेत मारहाण करणाऱ्यांना ताब्यात घेतले आहे.
नेमकं काय झालं?
हेही वाचा : CBSC Board राज्य मंडळ शाळांमध्ये सीबीएसई अभ्यासक्रमाचा समावेश : दादा भुसे यांची घोषणा – शालेय शिक्षणात मोठा बदल
बीड जिल्ह्यातील अंबाजोगाईतील दस्तगीरवाडी येथे एका तरूणाला मारहाण करण्यात आली. त्याला घाटात गाठले आणि दारू पिण्यासाठी पैशांची मागणी केली. तरूणाने नकार दिल्याने त्याला मारहाण करण्यात आली. दारू पिण्यासाठी पैसे दे म्हणत मारहाण करण्यात आली. तसेच तू आता गावात राहायचं नाही अशी धमकी देखील देण्यात आली. कृष्णा साळे असं या तरूणाचं नाव आहे. कृष्णाला तीन जणांनी मारहाण केली. या मारहाणीचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी प्रकरणाची दखल घेतली. या प्रकरणातील तीन आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. बीडमध्ये सातत्याने गुन्हेगारी वाढताना दिसत आहे. दिवसेंदिवस मारहाणीचे व्हिडिओ व्हायरल होत आहेत. गुन्हेगारांना कायदा आणि सुव्यवस्थेचा धाक उरलेला नाही असे काहीसे चित्र बीड जिल्ह्यात पाहायला मिळत आहे.
बीडची अनेक प्रकरणे सातत्याने अंजली दमानिया बाहेर काढताना दिसत आहेत. त्यातच आता दमानिया यांनी बीडमधील तरूणाला मारहाण झाल्याची व्हिडिओ पोस्ट केला आहे. बीडच्या अंबाजोगाई मध्ये पुन्हा मारहाण । तुला खल्लासच करतो म्हणत कृष्णा साळे, या दस्तगीरवाडी येथील अल्पवयीन मुलास रिंगण करून मारलं आहे. त्याचे पैसे घेतले, मोबाईल हिसकावला गेला. पोलीसांनी अट्रॉसिटी एक्ट खाली गुन्हा नोंदवला. एकाला अटकही झाली. पण बीडचे काही तरुण सुधारत नाहीत असे दिसतंय असे सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी म्हटले आहे. तसेच बीड पोलीस अधिकारी नवनीत कावत यांचे आभार देखील त्यांनी मानले आहेत.